Home /News /mumbai /

मुंबईमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने वाढणार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा धक्कादायक रिपोर्ट

मुंबईमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने वाढणार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा धक्कादायक रिपोर्ट

मुंबईत रुग्णवाढ दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी देखील प्रथमच सत्तरीपार गेला आहे. हा सरासरी कालावधी आता 72 दिवसांचा झाला आहे.

मुंबईत रुग्णवाढ दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी देखील प्रथमच सत्तरीपार गेला आहे. हा सरासरी कालावधी आता 72 दिवसांचा झाला आहे.

महाराष्ट्रात नोंदवलेल्या एकूण रुग्णांपैकी 66% एकट्या मुंबईतच आहेत. राज्यातील 251 मृत्यूंपैकी 60% मुंबई शहरातील आहेत.

    मुंबई, 22 एप्रिल : भारतात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. भारतात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 20 हजारांच्या जवळ पोहचत असताना महाराष्ट्रातही परिस्थिती गंभीर होत आहे. एकट्या महाराष्ट्रात कोरोनाचे 4 हजार 669 रुग्ण आहेत. यात मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. दरम्यान, ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पाच सदस्यीय टीमने असा अंदाज वर्तवला आहे की, मुंबईत 30 एप्रिलपर्यंत 42 हजार 604 कोरोना प्रकरणांची नोंद होईल. तर, हा आकडा 15 मेपर्यंत 6 लाख 56 हजार 407वर जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 16 एप्रिल रोजी मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची गणिती मॉडेलिंगच्या आधारे ही आकडेवारी जाहीर केली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरुवातीला एकत्र केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत 13 हजार 636 व्हेंटिलेटर आणि 4 लाख 83 हजार आयसोलेशन बेडचा अभाव असेल. त्यामुळे येत्या काळात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढल्यास राज्य सरकारपुढे मोठ्या समस्या असण्याची शक्यता आहे. वाचा-हजारो भारतीयांच्या जीवाशी खेळ, चीनचे रॅपिड टेस्ट किट निघाले खराब द हिंदू या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, राज्य सरकारने मंगळवारी आंतर-केंद्रीय मंत्रालय संघांकडे (IMCTs) राज्यातील आकडेवारी सादर केली. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारी आणि या आकडेवारीत विसंगती दिसून आली. राज्य सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीत मुंबईत 16 एप्रिलपर्यंत ऑक्सिजनच्या आधाराशिवाय वेगळ्या 30 हजार 481 बेडची कमतरता असेल. तर, ऑक्सिजनच्या सपोर्टवर असलेल्या 5 हजार 466 बेडची कमतरता असेल. तर, शहरात 40 हजारांपेक्षा जास्त कोरोना प्रकरणे गेल्यास तर, 1200 ICU बेड आणि 392 392 व्हेंटिलेटरची आवश्यकता असेल. तर, 15 मेपर्यंत रोजी ऑक्सिजनच्या आधाराशिवाय वेगळ्या 4 लाख 83 हजार 385 बेडची कमतरता असेल. तर, 27 हजार 688 ICU बेडची कमी भासेल. तर, 13 हजार 636 व्हेंटिलेटरची कमतरता असेल, असे अहवालात म्हटले आहे. वाचा-'अज्ञात आजार घेईल कोट्यवधी जीव', तज्ज्ञांनी 7 महिन्यांपूर्वीच केलं होतं सावध दरम्यान धारावी, वरळी-महालक्ष्मी, माटुंगा / सायन, परळ, अंधेरी पश्चिम, गोवंडी-मानखुर्द, नागपाडा आणि भायखळा या भागांमध्ये कोरोनाचे प्रमाण सर्वाधिक वाढेल. या भागातील उद्रेक सोडविण्यासाठी एकूण 8,434 स्वयंसेवकांची आवश्यकता आहे, असे अहवालात म्हटले आहे. वाचा-दिलासा देणारी बातमी, 15 तासांत 610 रुणांनी दिला कोरोनाविरुद्ध यशस्वी लढा महाराष्ट्रातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी द हिंदूला दिलेल्या माहितीत, "या आकडेवारीमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा हा 3.8 दराने दुप्पट करण्यात आला आहे. यावर आम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. डिस्चार्ज रूग्णांमध्ये तथ्य नसून झोपडपट्टीतील उच्च जोखमीच्या रुग्णांना वेगळे ठेवण्यात आले आहे. त्यामुळं या सगळ्या उपाय योजनेतून असे चित्र काढणे सिद्ध होत नाही", असे सांगितले. राज्याच्या एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने द हिंदूंला सांगितले, कोव्हिड-19 प्रकरणात महाराष्ट्राची तयारी दर्शविण्यासाठी अनेक मॉडेल्स वापरले जात आहेत. दरम्यान महाराष्ट्रात नोंदवलेल्या एकूण रुग्णांपैकी 66% एकट्या मुंबईतच आहेत. राज्यातील 251 मृत्यूंपैकी 60% मुंबई शहरातील आहेत. संपादन-प्रियांका गावडे
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या