नवी दिल्ली, 22 एप्रिल : कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत काही लोकं इतर शहरांमध्ये अडकले आहे. त्यामुळे कोरोनाच्या धाकातही काहींना घरी जाण्याची ओढ लागली आहे. त्यामुळं परराज्यातील मजूरांनी चक्क पायी चालत जाण्यास सुरुवात केली आहे. अशाच एक जोडप्यानं आपल्या लेकासह तब्बल 500 किमीचा प्रवास पायी केला आणि घर गाठलं. दयाराम कुशवाह आणि त्यांची पत्नी ज्ञानवती दिल्लीत इमारतीच्या बांधकामाचे काम करतात. मात्र लॉकडाऊनमुळे काम बंद झाले, उपजीविकेसाठी काही पर्याय नसल्यामुळे अखेर त्यांनी घरी जाण्याचा निर्णय घेतला. 26 मार्च रोजी इतर मजूरांसह दयाराम यांनी पायी प्रवास सुरू केला. त्याच्यासोबत 5 वर्षांचा त्यांचा मुलगाही होता. वाचा- मुंबईमध्ये कोरोना मोठ्या संख्येने वाढणार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा रिपोर्ट 28 वर्षीय दयारामने 5 वर्षांचा मुलगा शिवमला आपल्या खांद्यावर सुमारे 500 किमी चालत प्रवासाला सुरुवात केली. अखेर, चार दिवस सतत चालत राहिल्यानंतर काही दिवस ट्रकमधून प्रवास केल्यानंतर दयाराम आपल्या कुटुंबासह मध्य प्रदेशातील टीकमगड जिल्ह्यातील जुगाया या गावी पोहोचू शकले. लॉकडाउननंतर दयाराम यांना काम थांबवावे लागले आणि कुटुंबासाठी भोजन आणि भाड्याची व्यवस्था करणे अवघड होते. वाटेत चालणे कठीण झाले तेव्हा दयारामला त्यांनी आपल्या 7 वर्षांच्या दुसऱ्या मुलाची आठवण सतावत होती, जो आपल्या आजी-आजोबांसोबत गावी होता. तब्बल 500 किमी चालत प्रवास केल्यानंतर अखेर आपली घरी पोहचलेल्या दयारामचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. वाचा- हजारो भारतीयांच्या जीवाशी खेळ, चीनचे रॅपिड टेस्ट किट निघाले खराब दयाराम यांनी रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मी दिल्लीवर प्रेम करतो असे नाही. मला जगण्यासाठी पैशांची गरज आहे. गावी पैसे मिळत असते तर मी इथेच थांबलो असतो”. त्याच वेळी, दयाराम आणि इतर लोक जे दिल्लीहून गावात पोहोचले आहेत पण त्यांनी भीती वाटत होती की गावातले त्यांना वाळीत टाकतील. कोरोना पसरवू या भीतीने लोकं शंका घेतली. याबाबत दयाराम म्हणतात की, कोरोना विषाणूच्या दुर्घटनेमुळे त्याला त्याच्याच गावात परदेशी बनवले. वाचा- ‘अज्ञात आजार घेईल कोट्यवधी जीव’, तज्ज्ञांनी 7 महिन्यांपूर्वीच केलं होतं सावध सध्या आपल्या गावी असलेल्य दयाराम यांनी गहू कापणीच्या कामाला सुरुवात केली आहे. शहरांत मिळणाऱ्या पैशाच्या मानाने ही रक्कम कमी असली तरी, त्याचे मोल जास्त आहे. मुलं आणि आई-वडिलांसोबत राहताना एक वेळचं साधं जेवणही गोड लागतं. फक्त दयारामचं नाही तर शेकडो मजूर रोज पायी प्रवास करत आहे. काही आपल्या घरापर्यंत पोहचत आहेत, तर काहींना घरचा मार्गही अद्याप दिसत नाही आहे. संपादन-प्रियांका गावडे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.