Home /News /national /

हरयाणातील भाजप सरकार वाचणार की जाणार? मुख्यमंत्री खट्टर यांच्या टेन्शनमध्ये वाढ

हरयाणातील भाजप सरकार वाचणार की जाणार? मुख्यमंत्री खट्टर यांच्या टेन्शनमध्ये वाढ

हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांच्या विरोधात काँग्रेसनं अविश्वास दर्शक ठराव आणला आहे.

    चंदीगड, 10 मार्च: हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांच्या विरोधात काँग्रेसनं अविश्वास दर्शक ठराव आणला आहे. काँग्रेस पक्षानं तीन कृषी सुधारणा विधेयकाच्या विरोधात विधानसभेत अविश्वासदर्शक ठराव (No Confidence Motion) सादर करण्याची तयारी केली आहे. या विधेयकावरील चर्चेत शेतकऱ्यांच्या बाजूने कोण आणि सरकारच्या सोबत कोण आहे हे स्पष्ट होईल, असा दावा विरोधी पक्षनेते भूपिंदर सिंह हुड्डा (Bhupinder Singh Hooda) यांनी स्पष्ट केले. (Haryana Governments floor test today) खट्टर सरकारचे टेन्शन वाढले काँग्रेसने अविश्वास प्रस्ताव दाखल करताच भाजपने सर्व आमदारांसाठी व्हीप जारी केला आहे. त्यामुळे भाजप आमदारांना आता विधानसभेत उपस्थित राहणे तसंच सरकारची साथ देने बंधनकारक करण्यात आले आहे. ऐन वेळेस कोणताही पेचप्रसंग निर्माण होऊ नये म्हणून भाजपाकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे. जननायक जनता पार्टीच्या (JJP) चार आमदारांनी जेजेपी आणि उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला (Dushyant Chautala) यांच टेन्शन वाढलं आहे. जेजेपीचे आमदार देवेंद्र बबली यांनी सोमवारी विधानसभेतील चर्चेत कृषी विधेयकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आपण पक्षाच्या व्हीपचे पालन करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले असले तरी दुष्यंट चौटाला यांना सरकारमधून बाहेर पडण्याचा आग्रह करणार असल्याचं बबली यांनी सांगितले. आता लोकांमध्ये जाणे अवघड झाल्याचा दावा बबली यांनी केला आहे. देवेंद्र बबली यांच्या पाठोपाठ जोगीराम सिहाग, रामकुमार गौतम आणि जेजेपी विधीमंडळ पक्षाचे उपनेता इश्वर सिंह यांनीही आक्रमक प्रश्न विचारल्यानं पक्षाचे नेते दुष्यंत चौटाला यांच्या अडचणीत भर पडली आहे. (हे वाचा-उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना का द्यावा लागला पदाचा राजीनामा? वाचा महत्त्वाची कारणं ) काय आहे संख्याबळ? हरयाणा विधानसभेत भाजपाचे 40 आमदार असून त्यांना जेजेपीच्या 10 आणि 7 अपक्ष आमदारांपैकी 5 आमदारांचा पाठिंबा आहे. त्याचबरोबर हरयाणा लोकहीत पार्टीच्या एकमेव आमदाराचाही खट्टर सरकारला पाठिंबा आहे. हरयाणा विधानसभेत एकूण 90 आमदार असून 2 जागा सध्या रिक्त आहेत. त्यामुळे बहुमतासाठी खट्टर सरकारला 45 मतांची आवश्यकता आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BJP, Haryana, राज CM

    पुढील बातम्या