बंगऴुरु 10 मार्च : एका कथित सेक्स सीडी (Sex CD) प्रकरणामुळे कर्नाटकातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. या प्रकरणामुळे कर्नाटकचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी (Ramesh Jarkiholi) यांना राजीनामा द्यावा लागला. मात्र, आपल्याला मुद्दाम या प्रकरणात फसवलं गेलं असल्याचा आरोप आता जारकीहोळी यांनी केला आहे. ते म्हणाले, की राज्यातील महानायकानं त्यांना याच अडकवलं आहे आणि सीडीमध्ये जी महिला दिसत आहे, तिला या कामासाठी पाच कोटी रुपये दिले गेले होते. माध्यमांसोबत केलेल्या बातचीतमध्ये जारकीहोळी यांनी दावा केला, की त्यांचं राजकीय करिअर संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या कुटुंबाला विवादात आणण्यासाठी कोणीतरी कट रचत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
भाजप नेत्यानं म्हटलं, की एक मोठा नेताही या षडयंत्रामध्ये सामील आहे. माझा अपमान करणाऱ्यांना तुरुंगात पाठवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. जारकीहोळी यांनी असाही दावा केला, की त्यांच्याविरोधात कट रचणारे लोक बेळगावीचे नसून बंगळुरुमधील आहेत. ते म्हणाले, की मला आणि माझ्या कुटुंबाला बदनाम करण्याच्या या प्रयत्नाची संपूर्ण माहिती मी जमा करत आहे. हे सगळं राजकारणामुळं नाही तर माझं राजकीय जीवन संपवण्यासाठी केलं जात आहे. ते म्हणाले, की यात सामील असणारा नेता आणि इतरांचा माहिती लगेच देणं घाईचं ठरेल.
जारकीहोळी म्हणाले, या कटामध्ये सामील असणारा नेता हा बंगळुरुचा आहे. तो उत्तर कर्नाटकचा नाही. आम्ही उत्तर कर्नाटकमध्ये अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण करत नाही. अडचणीत असताना आम्ही आमच्या शत्रुंनाही मदत करतो. त्यामुळे, हे घाणरडं राजकारण बंगळुरू क्षेत्रातील लोकांकडून केलं जात आहे.
जारकीहोळी म्हणाले, की ते सेक्स सीडी त्यासाठीचा आर्थिक पुरवठा आणि वाटपासंबंधीच्या प्रयत्नांच्या चौकशीची मागणी करणार आहेत. माझ्यासाठी माझ्या कुटुंबाची प्रतिमा सर्वाधिक महत्त्वाची आहे. प्रसार माध्यमांमध्ये जारकीहोळी आणि अज्ञात महिलेमध्ये झालेल्या बोलण्याची सीडी आणि ऑडिओ रेकॉर्डिंग प्रसारीत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच जारकीहोली यांनी येडियुरप्पा यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारमधून राजीनामा दिला. जारकीहोली यांनी दावा केला आहे, की संबंधित महिलेला 5 कोटी रुपये आणि विदेशात एक अपार्टमेंट दिलं गेलं आहे. सध्या मी सगळी माहिती जमा करत आहे. आपण काहीही चुकीचं काम केलं नसल्याचं जारकीहोळी यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Karnataka, Ramesh Jarkiholi, Sexual assault, Water supply minister, Yediyurppa