• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • श्रीनगरमध्ये चकमक; पाकिस्तानी दहशतवादी आणि लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अबरारचा खात्मा

श्रीनगरमध्ये चकमक; पाकिस्तानी दहशतवादी आणि लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अबरारचा खात्मा

यात एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा आणि लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरचा खात्मा (Lashkar-e-Taiba commander Abrar) करण्यात जवानांना यश आलं आहे.

 • Share this:
  श्रीनगर 29 जून : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील मलोरा पारिमपोरा भागात सोमवारी संध्याकाळपासून दशहदवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक (Encounter in Srinagar) सुरू आहे. पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान सोमवारी सायंकाळीच याठिकाणी दाखल झाले आहेत. दरम्यान आता यात एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा आणि लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरचा खात्मा (Lashkar-e-Taiba commander Abrar) करण्यात जवानांना यश आलं आहे. काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना याबाबतची माहिती दिली आहे. कोरोनाची तिसरी लाट येणार, येणार पण कधी? मोदी सरकारने अखेर दिली महत्त्वाची अपडेट दरम्यान सोमवार संध्याकाळपासून सुरू असलेल्या या चकमकीत एक पोलीस उपनिरीक्षक आणि सीआरपीएफचा एक जवानही जखमी झाला असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीत म्हटलं, की हायवेवर काही दहशवादी हल्ला करणार असल्याची माहिती मिळाली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता तात्काळ सीआरपीएफ आणि पोलिसांनी हायवेवर नाकाबंदी केली. यावेळी पारीमपोरा नावा येथे पोलिसांनी एक गाडी अडवून आतील व्यक्तींना विचारपूस केली असता आत बसलेला एक व्यक्ती आपली बॅग उघडून त्यातून ग्रेनेड बाहेर काढू लागला. यानंतर या व्यक्तीला तात्काळ ताब्यात घेण्यात आलं. ड्रायव्हरसह या व्यक्तीला पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आलं. याठिकाणी त्यांचे मास्क काढले असता हा लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर असल्याचं लक्षात आलं. मोठी घोषणा! ‘या’ राज्यातील प्रत्येक दलित कुटुंबाला मिळणार 10 लाख रुपये यानंतर त्याच्याकडून एक पिस्तूल आणि ग्रेनेड जप्त करण्यात आलं. मालोरामधील एका घरामध्ये AK-47 ठेवली असल्याचंही त्यानं चौकशीत उघड केलं. हे जप्त करण्यासाठी पोलीस त्या घरात गेले असता आतमध्ये असणाऱ्या दहशतवाद्यानं पोलिसांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. या चकमकीत सीआरपीएफचे तीन जवान जखमी झाले. तर, याच दरम्यान अबरार या टॉप कमांडरचा खात्मा (Pakistani Terrorist Killed in The Encounter With Security Forces) करण्यात आला. अबरारचा याआधीही अनेक हल्ल्यांमध्ये हात असल्याचं म्हटलं जात आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: