नवी दिल्ली, 28 जून : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा (Corona third wave) धोका वर्तवला जातो आहे. त्यादृष्टीने तयारीही सुरू झाली आहे. तिसऱ्या लाटेशी (Third wave of corona) लढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार तयारी करत आहे. पण कोरोनाची ही तिसरी लाट (Corona wave) नेमकी येणार तरी कधी? असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर अखेर केंद्र सरकारने दिलं आहे. कोरोनाची तिसरी लाट कधी येणार, याबाबत केंद्रीय कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल (Dr. VK Paul) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. कोरोनाची तिसरी लाट आणि त्याचे परिणाम याबाबत त्यांनी खुलासा केला आहे. पीटीआयशी बोलताना डॉ. व्ही. के. पॉल (Dr. VK Paul) यांनी सांगितलं, महासाथीच्या पुढील लाटेची निश्चित वेळ सांगू शकत नाही. कोरोनाच्या पुढच्या कोणत्याही लाटेची निश्चित वेळ सांगणं योग्य नाही कारण कोरोनाचा व्यवहार अनिश्चित आहे. महासाथीविरोधात सातत्याने प्रभावी पावलं उचलणं गरजेचं आहे. हे वाचा - Pregnancy मध्ये कोरोनाचा धोका वाढला! 2 दिवसांचा गर्भही कोविड पॉझिटिव्ह कोरोनाची पुढील लाट किती मोठी असेल हे अनेक कारणांवर अवलंबून आहे. लोकांचा कोरोनासंबंधी व्यवहार, टेस्टिंगच संख्या, कंटेन्मेंट रणनीती आणि लसीकरणाचं प्रमाण महत्त्वाचं आहे. शिवाय व्हायरसचा अनिश्चित व्यवहारही मोठं कारण ठरू शकतं, असंही डॉ. पॉल यांनी सांगितलं. महासाथीच्या (Pandemic) कालावधीत येणाऱ्या लाटांचा अर्थ काय असतो? याची निश्चित अशी कोणतीही व्याख्या नाही. तथापि साथीच्या आजारांदरम्यान विशिष्ट काळातील संक्रमणाची वाढ किंवा घट यास आलेखाच्या परिभाषेत लाट (Wave) म्हणून संबोधलं जातं किंवा समजलं जातं. ही वाढ ग्रोथ कर्व्हसारखी (Growth Curve) दिसते. महासाथ ही अनेक वर्षांतून एकदा येते. परंतु अनेक प्रकारचे संसर्ग एका विशिष्ट मोसमात हल्ला करतात. तेव्हा त्यांची तीव्रता जाणून घेण्यासाठी देखील लाट किंवा वेव्ह टर्मचा (Wave Term) उपयोग केला जातो. हे संसर्ग अचानक येतात, वाढतात आणि गायब होतात. परंतु एका विशिष्ट कालावधीत हे संसर्ग पुन्हा सक्रिय होतात. यालाच लाट म्हणतात. लाटेचा धोका काय? तिसऱ्या लाटेसंदर्भात बोलायचं झालं तर दुसऱ्या लाटेपेक्षाही ही लाट अधिक गंभीर असेल असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. मात्र याला कोणतंही ठोस प्रमाण नाही. सर्वसामान्यपणे प्रत्येक लाटेनंतर विषाणूची (Virus) ताकद कमजोर पडत जाते. हे म्हणजे असं असतं की प्रथमच विषाणू आल्यानंतर संसर्ग नव्याने होतो. कोणत्याही व्यक्तीमध्ये याला विरोध करू शकणारी रोगप्रतिकारक शक्ती नसते, तसंच उपचार पद्धती देखील. त्यामुळे विषाणूचा संसर्ग वेगाने पसरतो आणि या संसर्गात जर एखादी व्यक्ती सापडली तर त्यांच्यावर गंभीर किंवा सौम्य परिणाम होतो. हे वाचा - सावधान! Post Covidची ‘ही’ लक्षणं दिसताच, लगेच गाठा रुग्णालय पहिल्या लाटेत संक्रमित झालेल्या लोकांमध्ये अँटीबॉडी (Antibody) तयार झालेल्या असल्याने दुसऱ्या लाटेत या लोकांवर फारसा परिणाम होत नाही. भारतामध्ये दिसली उलट स्थिती आपल्याकडे लाट पहिल्यांदा मोठी आणि नंतर कमजोर पडण्याच्या अनुमानाचा उलटा परिणाम दिसून आला. पहिल्यांदा ऑगस्ट 2020 मध्ये कोरोनाची लाट आली. मात्र त्या कालावधीत सध्याच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या फारशी नव्हती. या लाटेत मागील लाटेच्या तुलनेत पॉझिटिव्हीटी रेट (Positivity Rate) चौपट झाल्याचं दिसून आलं. पहिल्या लाटेत संक्रमित झालेले लोक या लाटेत देखील संक्रमित झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे तिसरी लाट यापेक्षा गंभीर असू शकते, या अंदाजामुळे तज्ज्ञ मंडळी चिंतेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.