मुंबई, 11 फेब्रुवारी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या 2020च्या अर्थसंकल्पात (budget 2020) देशभरातील महत्त्वांच्या ठिकाणांना जोडण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता. तेजस एक्स्प्रेसप्रमाणे खासगी रेल्वे सुरू करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. याकरता टाटा-अदानी सारख्या बड्या कंपन्या गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. देशभरातील 100 मार्गांची याकरता निवड करण्यात आली आहे. देशातील तसेच विदेशी बड्या समुहांनी यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी रस दाखवला आहे. जगभरातील अनेक महत्त्वाच्या खासगी समुहांनी भारतीय रेल्वेच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. यामध्ये अलस्टॉम ट्रान्सपोर्ट, बॉम्बॅर्डिअर, सिएमेन्स एजी, ह्युंदाई रोटेम कंपनी आणि मॅकक्वेरी या जागतिक मोठ्या समुहांचा समावेश आहे. टाटा रिअलिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर, हिताची इंडिया अँड एशिया, एस्सल गृप, अदानी पोर्ट्स आणि सेझ भारतीय रेल्वे केटरिंग अॅड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) या देशांतर्गत कंपन्यांचा समावेश आहे. तेजस एक्स्प्रेससारख्या 100 खासगी रेल्वे धावणार -150 खासगी रेल्वे सुरू करण्याचा भारतीय रेल्वेचा मानस आहे. यामध्ये 100 मार्गांचा समावेश आहे. या 100 मार्गांचं विभाजन 10 ते 12 क्लस्टर्समध्ये करण्यात येईल. -मुंबई ते नवी दिल्ली, चेन्नई ते नवी दिल्ली, नवी दिल्ली ते हावडा, शालिमार ते पुणे, नवी दिल्ली ते पाटणा अशा काही महत्त्वाच्या मार्गांचा यामध्ये समावेश आहे. - या मार्गांवरील खाजगी ट्रेन सुटताना 15 मिनीटांमध्ये इतर कोणतीही ट्रेन सुटणार नाही (हेही वाचा - शेअर बाजारात गुंतवणूक ठरणार फायद्याची, आज सेन्सेक्सची 400 अंकांनी मुसंडी ) -प्रत्येक नवीन ट्रेनमध्ये 16 डब्बे असणार आहेत आणि या गाड्या दरताशी 160 किमी वेगाने धावतील -या गाड्यांचं भाडेरचना ठरवण्याचा निर्णय खाजगी कंपनीकडेच राहील. ट्रेनच्या मेंटेनन्सची जबाबदारीही या कंपन्याकडे असेल अन्य बातम्या रेल्वेचं तिकीट कन्फर्म झालं नाही तर विमानाने करा प्रवास, ही कंपनी देणार ऑफर Teddy आणि Rose च्या जागी दिलं असं गिफ्ट की, पुणे पोलिसांचं तुम्हीही कराल कौतुक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.