जाहिरात
मराठी बातम्या / मनी / शेअर बाजारात गुंतवणूक ठरणार फायद्याची, आज सेन्सेक्सची 400 अंकांनी मुसंडी

शेअर बाजारात गुंतवणूक ठरणार फायद्याची, आज सेन्सेक्सची 400 अंकांनी मुसंडी

शेअर बाजारात गुंतवणूक ठरणार फायद्याची, आज सेन्सेक्सची 400 अंकांनी मुसंडी

BSE सेन्सेक्समध्ये 400 अंकांची उसळी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 41 हजार 445 अंकावर पोहोचला आहे. NSE निफ्टी 120 अंकांनी वाढून 12 हजार 150 वर पोहोचला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 फेब्रुवारी : कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली घसरण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेल्या खरेदीमुळे शेअर बाजार वधारला आहे. सेन्सेक्समध्ये 400 अंकांची वाढ झाली असून निफ्टीही 120 अंकांनी वधारला आहे. BSE सेन्सेक्समध्ये 400 अंकांची उसळी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 41 हजार 445 अंकावर पोहोचला आहे. NSE निफ्टी 120 अंकांनी वाढून 12 हजार 150 वर पोहोचला आहे. आजच्या घडीला मोठ्या प्रमाणात शेअर्सची खरेदी केली जात आहे. निफ्टीच्या ऑटो इंडेक्समध्ये 0.81 टक्के, आयटी इंडेक्समध्ये 0.41 टक्के, एफएमसीजी इंडेक्समध्ये 1.04 टक्के , मेटल इंडेक्समध्ये 0.99 टक्के आणि फायनान्शिअल सर्विस इंडेक्समध्ये 0.58 टक्क्यांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. बँकिंग शेअर्समध्ये जोरदार उसळी दिसली. शेअर बाजारात उसळी आल्याची कारणं वीएम पोर्टफोलियोचे रिसर्च हेड विवेक मित्तल यांनी न्यूज18 हिंदीला दिलेल्या माहितीनुसार, क्रुड तेलाच्या किंमतीत झालेली घसरण ही भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत आनंददायक बातमी आहे. कारण कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या घसरणीचा परिणाम थेट भारतीय अर्थव्यवस्थेवर होतो. त्यामुळे कच्चं तेल स्वस्त होणं सामान्य जनतेबरोबरच सरकारसाठी फायद्याचं आहे. विवेक यांनी कोरोना व्हायरसचा अर्थव्यवस्थेवर होत असलेल्या परिणामावर सुद्धा भाष्य केलं. एखादा व्हायरस ठराविक काळापर्यंतच तग धरु शकतो. त्याचप्रमाणे वातावरणात झालेले बदल सुद्धा व्हायरसवर परिणाम करतात. (हेही वाचा : ‘मिशन हनी’ : या महिलेने मधाचं उत्पादन करून मिळवले साडेचार लाख) त्यामुळे मार्चअखेरपर्यंत चीनमधून कोरोना व्हायरस संपूष्टात येईल असा विश्वास विवेक यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाण चीन सरकार सुद्धा या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत आहे. कोरोना व्हायरसमुळे ठेच पोहोचलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी चीन सरकार 12 हजार 900 कोटी डॉलर खर्च करत आहे. त्याचा सुद्धा परिणाम शेअर मार्केटवर दिसून येत आहे.

जाहिरात

करा स्मार्ट गुंतवणूक एका मोठ्या ब्रोकरेज हाऊसच्या अहवालानुसार पेट्रोनेट एलएनजी आणि ऑइल इंडियाचे शेअर खरेदी केले जाऊ शकतात. मॉर्गन स्टेनलीच्या अहवालातही Petronet LNGच्या शेअर्सना चांगलं रेटिंग दिलं आहे.अशाप्रकारे स्मार्ट गुंतवणूक केल्यास तुम्ही चांगला नफा मिळवू शकाल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात