रेल्वेचं तिकीट कन्फर्म झालं नाही तर विमानाने करा प्रवास, ही कंपनी देणार ऑफर

रेल्वेचं तिकीट कन्फर्म झालं नाही तर विमानाने करा प्रवास, ही कंपनी देणार ऑफर

या अ‍ॅपमध्ये बुक केलेलं तिकीट कन्फर्म झालं नाही तर प्रवाशांना विमानाचं तिकीट बुक करून दिलं जाईल. याचा अर्थ स्पष्ट आहे की, तुमचं तिकीट RAC असेल किंवा कन्फर्म नसेल तर ही कंपनी विमानाचं तिकीट काढून देईल.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी : तुम्ही रेल्वेचं तिकीट काढलंत तर सगळ्यात मोठी चिंता असते ती तिकीट कन्फर्म होण्याची. तात्काळमध्ये तिकीट काढण्याचीही सोय असते पण त्यासाठी जास्त पैसे द्यावे लागतात पण ही समस्याही लवकरच दूर होऊ शकते. मुंबईच्या एका स्टार्टअपने दावा केला आहे की ऐनवेळी रेल्वे तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची ही अडचण सोडवता येऊ शकते. या स्टार्टअप कंपनीने Railofy नावाचं एक खास अ‍ॅप आणलं आहे.

देशभरात सुरू होणार सेवा

सध्या हे अ‍ॅप मुंबईमध्ये लाँच करण्यात आलंय. यामध्ये रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्याची सुविधा आहे. या अ‍ॅपमध्ये प्रवाशांना 50 ते 500 रुपये देऊन नोंदणी करता येते. एकदा नोंदणी केली की तात्काळ तिकीट बुक करण्याची सुविधा मिळेल. लवकरच हे अ‍ॅप देशभरातल्या प्रवाशांसाठी उपलब्ध केलं जाणार आहे.

या अ‍ॅपमध्ये बुक केलेलं तिकीट कन्फर्म झालं नाही तर प्रवाशांना विमानाचं तिकीट बुक करून दिलं जाईल. याचा अर्थ स्पष्ट आहे की, तुमचं तिकीट RAC असेल किंवा कन्फर्म नसेल तर ही कंपनी विमानाचं तिकीट काढून देईल.

(हेही वाचा : SBI मध्ये खातं असेल तर 28 फेब्रुवारीपर्यंत करा हे काम नाहीतर खातं होईल ब्लॉक)

रांगेतून होईल सुटका

या कंपनीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकारचा ट्रॅव्हल इन्शुरन्स हे एक चांगलं पाऊल आहे. या अ‍ॅपच्या सोयीमुळे तिकीट काउंटरवरच्या लांब रांगेतून तुमची सुटका होईल. त्याचबरोबर एजंट्सच्या फंदात पडण्याचीही गरज नाही. या तिकिटाचा दर वेटिंग लिस्ट नंबर आणि प्रवासाच्या अंतरावर अवलंबून असेल.

==================================================================================

First published: February 10, 2020, 2:54 PM IST

ताज्या बातम्या