अनलॉक 1 मध्ये ‘या’ राज्यानं आज रात्रीपासून पुन्हा लागू केला कडक लॉकडाऊन

अनलॉक 1 मध्ये ‘या’ राज्यानं आज रात्रीपासून पुन्हा लागू केला कडक लॉकडाऊन

सरकारनं अनलॉक 1.0 ची सुरुवात केली आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये सूट दिल्यानंतर देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत जास्त वाढ झाली आहे.

  • Share this:

चेन्नई, 18 जून : देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. यातच सरकारनं अनलॉक 1.0 ची सुरुवात केली आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये सूट दिल्यानंतर देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत जास्त वाढ झाली आहे. परिणामी आता तामिळनाडू राज्यानं पुन्हा कडक लॉकडाऊन लागू करण्याचे जाहीर केले आहे. आज रात्रीपासून राज्यात लॉकडाऊन लागू होईल. यामध्ये लोकं केवळ आवश्यक सामान खरेदीसाठी 2 किमी अंतरापर्यंत जाऊ शकतात. चेन्नईमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, देशातील इतर राज्यांमध्ये 30 जूनपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असला तरी, रेड झोनमध्ये सूट देण्यात आली आहे. 30 जूननंतर पुन्हा लॉकडाऊन जाहीर करणार का, याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही आहे. 15 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती, त्यावेळी देशात आता लॉडाऊन नाही तर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. याच पद्धतीने आता पुढे जायचं आहे असं पंतप्रधानांनी सांगितल्याची माहिती दिली होती.

वाचा-ना औषध ना लस! आता 'या' पद्धतीनं होणार कोरोनावर उपचार, भारतीय डॉक्टरांचा दावा

सुमारे दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर भारत सरकारने 1 जूनपासून अनलॉक म्हणजे लॉकडाऊनमध्ये मुभा देण्याची करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परंतु देशात कोरोनामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी 45 टक्के मृत्यूही या 15 दिवसांत घडले आहेत. भारतात आतापर्यंत कोरोनामुळे 12 हजारहून अधिक लोकांनी प्राण गमावले आहेत, त्यामध्ये अनलॉक केल्यावर 4507 मृत्यू झाले आहेत.

वाचा-पुण्यात कोरोनाचा कहर! नवे हॉटस्पॉट आले समोर, आठवडाभरात आढळले 360 च्यावर रुग्ण

24 तासांत 12 हजार 881 नवीन रुग्ण

भारतातील कोरोनाबाधितांच्या आकड्यांनी सरकारची चिंता वाढवली आहे. सलग पाचव्या दिवशी 10 हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहे. गेल्या 24 तासात आतापर्यंत सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. तर 334 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवसात देशात तब्बल 12 हजार 881 नवीन रुग्ण आढळून आले. यासह भारतातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 3 लाख 66 हजार 946 झाली आहे. पहिल्यांदाच नवीन कोरोनाबाधितांचा आकडा हा 12 हजारहून जास्त आहे.

वाचा-देशात पुन्हा Lockdown लागणार का? पतंप्रधान मोदींनी दिलं हे उत्तर

संपादन-प्रियांका गावडे.

First published: June 18, 2020, 2:20 PM IST

ताज्या बातम्या