नवी दिल्ली, 18 जून : जगभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दुसरीकडे अद्याप कोरोनावर कोणतेही ठोस उपाय शोधता आलेले नाही आहेत. लस आणि औषधांचा शोध जगभरातील 100 देश घेत आहेत. काही देशांनी लसीच्या ट्रायलला सुरूवात केली आहे. तर, काही देशांनी औषधांची चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. यातच भारतीय डॉक्टर आता कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी नवीन थेरपी वापरण्याच्या तयारीत आहेत.
रेडिएशन थेरपीद्वारे (radiation therapy) कोरोना रूग्णांमधील न्यूमोनियाचा परिणाम कमी करण्यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसनं (AIIMS) संशोधन सुरू केलं आहे. यामुळे कोरोना रूग्णांवरील उपचारांसाठीही मदत होईल.
AIIMSच्या रेडिएशन ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख आणि या संशोधनाचे प्रमुख अभ्यासत डॉ. डीएन शर्मा यांनी सांगितले की, ऑक्सिजनवर असलेल्या दोन कोरोना रुग्णांना शनिवारी रेडिएशन थेरपी देण्यात आली. डॉ शर्मा म्हणाले की, या दोन्ही कोरोना रूग्णांचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त आहे. या कोरोना रूग्णांना यापूर्वी ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते, मात्र आता रेडिएशन थेरपीनंतर या रुग्णांच्या प्रकृतीत सुधार झाला आहे. आता त्यांचा ऑक्सिजन सपोर्ट काढण्यात आला आहे.
वाचा-रुग्णांच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या 'या' औषधाचं ट्रायल थांबवलं
डॉक्टर म्हणाले की, बहुधा रेडिएशन थेरपीचा उच्च डोस कर्करोगाच्या उपचारांसाठी दिला जातो, परंतु या दोन कोरोना रूग्णांना कमी डोसची रेडिएशन थेरपी देण्यात आली. डॉ. शर्मा यांनी असेही सांगितले की, या कोरोना रूग्णांवर रेडिएशन थेरपीचा कोणताही वाईट परिणाम झाला नाही. डॉ. शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा अँटीबायोटिक्स उपलब्ध नव्हते, तेव्हा रेडिएशन थेरपी फक्त 1940 च्या दशकात न्यूमोनियाच्या उपचारात वापरली जात असे.
वाचा-Diabetes, BP असलेल्या लोकांसाठी कोरोना धोकादायक, मृत्यूचा धोका 12 पट जास्त
दरम्यान आता पायलट प्रकल्पांतर्गत आणि कोरोनाच्या 8 रुग्णांवर रेडिएशन थेरपीद्वारे उपचार केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यानंतर येणाऱ्या निकालांचे विश्लेषण केले जाईल.
या औषधावर WHOनं घातली बंदी
जागतिक आरोग्य संघटनेने मात्र कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरलं जाणारं मलेरियाचे औषध हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या (hydroxychloroquine) ट्रायलवर बंदी घातली आहे. ट्रायलचे कार्यकारी समुह आणि मुख्य अभ्यासक यांनी सॉलिडॅरिटी ट्रायल, ब्रिटनमधील रिकव्हरी ट्रायल आणि अन्य पुरावे लक्षात घेऊन चाचणी हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी सायन्स जनर्ल 'द लान्सेट'मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानंतर HCQ चाचणीवर बंदी घालण्यात आली होती पण नंतर ही बंदी मागे घेण्यात आली होती.
वाचा-पुण्यात 5 हजार दुकाने उघडली, 98 टक्के भाग प्रतिबंधित क्षेत्राबाहेर; धोका वाढला
संपादन-प्रियांका गावडे.