देशात पुन्हा Lockdown लागणार का? पतंप्रधान मोदींनी दिलं हे उत्तर

देशात पुन्हा Lockdown लागणार का? पतंप्रधान मोदींनी दिलं हे उत्तर

अनलॉक नंतर भारतातल्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज काही हजार रुग्णांची देशात भर पडत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 17 जून: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या टप्प्यात देशातल्या 15 मुख्यमंत्र्यांशी आज चर्चा केली. आता देशात पुढे कसं जायचं यावर यावेळी चर्चा झाली. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊन लागणार का अशी चर्चा सुरू झालीय. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी याबाबत पंतप्रधानांना प्रश्न विचारला होता. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी त्यांना थेट उत्तर दिलं.

पंतप्रधान म्हणाले, देशात आता लॉडाऊन नाही तर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. याच पद्धतीने आता पुढे जायचं  आहे असं पंतप्रधानांनी सांगितल्याची माहिती राव यांच्या कार्यालयाने दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी 16 आणि 17 जून असे दोन दिवस देशातल्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती.

अनलॉक नंतर भारतातल्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज काही हजार रुग्णांची देशात भर पडत आहेत. आत्तापर्यंत 3.55 लाख रुग्ण देशात झाले आहेत. तर 12 हजार रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे देशातला कोरोना रुग्णांचा मृत्यूदर वाढला असून हा तर जगातल्या 100 देशांपेक्षा जास्त झाला आहे. शेजारच्या बांगलादेशपेक्षाही हा दर जास्त असून धोका वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत.

राज्यात आजही 3307 रुग्णांची धक्कादायक वाढ, एकूण संख्या गेली 1 लाख 16 हजारांवर

सुमारे दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर भारत सरकारने 1 जूनपासून अनलॉक म्हणजे । कडाऊन सुलभ करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परंतु देशात कोरोनामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी 45 टक्के मृत्यूही या 15 दिवसांत घडले आहेत. भारतात आतापर्यंत कोरोनामुळे 12 हजार लोकांनी प्राण गमावले आहेत, त्यामध्ये अनलॉक केल्यावर 4507 मृत्यू झाले आहेत.

हेही वाचा -

काय निर्णय घेणार ठाकरे सरकार? चकमकीपूर्वी चिनी कंपन्यांसोबत झाला होता करार

कहर! आरोग्यमंत्रीही कोरोनाच्या विळख्यात; रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

First published: June 17, 2020, 9:04 PM IST

ताज्या बातम्या