मराठी बातम्या /बातम्या /देश /भारीच! 30 वर्षांपासून कुत्र्यांना जगवणारा श्वानप्रेमी, पदरमोड करुन करतोय रोजचा खर्च!

भारीच! 30 वर्षांपासून कुत्र्यांना जगवणारा श्वानप्रेमी, पदरमोड करुन करतोय रोजचा खर्च!

ही व्यक्ती गेल्या 30 वर्षांपासून भटक्या कुत्र्यांना जगवत आहे. त्यांना जगवण्यासाठी ते पदरमोड देखील करतात.

ही व्यक्ती गेल्या 30 वर्षांपासून भटक्या कुत्र्यांना जगवत आहे. त्यांना जगवण्यासाठी ते पदरमोड देखील करतात.

ही व्यक्ती गेल्या 30 वर्षांपासून भटक्या कुत्र्यांना जगवत आहे. त्यांना जगवण्यासाठी ते पदरमोड देखील करतात.

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 28 मार्च : 'प्राणीमात्रावर दया करा' ही शिकवण संतांनी आपल्याला दिली आहे. संतांच्या या शिकवणीचे आधुनिक काळातही पालन करणारी व्यक्ती आहे. ती व्यक्ती गेल्या 30 वर्षांपासून भटक्या कुत्र्यांची काळजी घेते. त्यांना प्रेमानं खाऊ घालतात. या कुत्र्यांचा ते अतिशय मायेनं सांभाळ करतात. त्यांच्या या कामाची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

    कशी झाली सुरूवात?

    तमिळनाडूमधल्या विरुधुनगर जिल्ह्यातील शिवयोगन असं या व्यक्तीचं नाव आहे. ते त्यांच्या वर्कशॉपभोवती फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांची काळजी घेतात. या कुत्र्यांसाठी ते रोज 25 किलो तांदूळ शिजवून भात बनवतात. कुत्र्यांना खायला देण्यासाठी अनेकदा तांदूळ दान म्हणून मिळत असल्याने खर्चाची त्यांना चिंता नाही. बऱ्याचदा, ते स्वतःच्या कमाईतूनही पैसे खर्च करून कुत्र्यांना खायला देतात.

    संभाजीनगरातील रुग्णालयात वानराच्या नावे बेड; 2 तास झोपण्यासाठी येतो अन्...Video व्हायरल

    'न्यूज 18 तमिळ'शी बोलताना शिवयोगन म्हणाले की, 'ते भगवान भैरवांचे कट्टर भक्त आहेत आणि कुत्र्यांना खायला घालणं ही भगवान भैरवाची सेवा आहे असं त्यांचं मत आहे. कुत्र्यांना असंच खाऊ घालत राहिल्यास देव त्यांना त्यांच्या व्यवसायात मदत करेल, असा त्यांचा विश्वास आहे.

    शेतकऱ्याच्या 10 वर्षाच्या परिश्रमाला यश, द्राक्षांच्या वाणाला मिळाली जागतिक मान्यता, Video

    शिवयोगन फक्त या कुत्र्यांना खाऊ-पिऊच घालत नाहीत, तर त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतात. कुत्र्यांचं लसीकरण योग्य प्रकारे होईल, याची ते काळजी घेतात. असं केल्याने भटक्या कुत्र्यांमुळे होणाऱ्या त्रासावर नियंत्रण ठेवता येईल, असंही शिवयोगन यांनी मुलाखतीत सांगितलं. त्यासाठी कुत्र्यांचं योग्यरीत्या लसीकरण केले पाहिजे, असं मत व्यक्त करून त्यांनी सर्वांनी आपल्या पाळीव कुत्र्यांचीही योग्य काळजी घ्यायला हवी, असं आवाहन त्यांनी केलं.

    First published:
    top videos

      Tags: Dog, Local18, Tamil nadu