अविनाश कानडजे, छ.संभाजीनगर, 28 मार्च : रक्ताची आणि मैत्रीची नाती जशी घट्ट असायला हवी असा संदेश दिला जातो. त्याप्रमाणेच निसर्ग, प्राणी यांच्या सोबत सुद्धा घट्ट नातं असलं पाहिजे. प्राण्यावर कठीण प्रसंग आल्यानंतर मनुष्य धावतो, प्राणीही मानवावर प्रेम करतो. असाच मैत्री प्रेमाचा अतुट नाते सांगणारा प्रसंग छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील पैठणच्या रजापूर येथील डॉक्टर प्रकाश गायकवाड यांच्या हॉस्पिटलमध्ये अनुभवाला मिळत आहे.
हे वानर तहान-भुकेने व्याकूळ झाले की ते कुहू...कुहू..करीत धावत येथील हॉस्पिटलमध्ये येतो. ते मायेने त्याला कुरवाळतात. खाऊ-पिऊ घालतात. त्यानंतर हे वानर एक दोन तास खुशाल आराम करायचं. हा सिलसिला लगातदार पंधरा दिवस सुरूच राहिला. त्यानंतर या डॉक्टरांनाही त्याचा आणि हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांनाही घरातल्या जीवाप्रमाणेच या माकडाच्या पिलालाही मनुष्याच्या प्रेमाचा लळा लागला होता. शनिवारी सकाळी हे वानर डॉक्टरांच्या घरात घुसले तिथून काही निघायचे नाव घेईना शेवटी डॉक्टरांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह प्राणिमित्रांनी त्याला सोबत घेऊन वेरूळच्या जंगलात सोडले. या वानरने गावकऱ्यांना मात्र या पंधरा दिवसांमध्ये आपलं लळा लावला होता त्यामुळे ग्रामस्थांनी जड अंतकरणाने या माकडाला निरोप दिला.
छत्रपती संभाजीनगर : पैठणमधील एका हॉस्पिटलमध्ये वानर करायचं एक दोन तास आराम, VIDEO झाला व्हायरल pic.twitter.com/2B6XyTQ0dY
— News18Lokmat (@News18lokmat) March 28, 2023
राजापूर येथे एका क्लिनिकमध्ये पंधरा दिवसांपूर्वी एका वानराने प्रवेश केला तेव्हा रुग्णालयात आलेले रुग्ण घाबरून गेले मात्र वानर रुग्णाप्रमाणेच बेडवर झोपले. सलाईन संपल्यानंतर रुग्ण निघून जात होते हे पाहून वानरही तास भराणे तिथून निघून गेले, पंधरा दिवस सतत हे वानर बेडवर येत होते, यादरम्यान त्याने कुणालाच त्रास दिला नाही तेथे आलेले रुग्ण त्याच्या अंगावरून हात फिरवायचे मुले त्याचे शेपूट पकडायचे मात्र त्याने कोणालाही त्रास दिला नाही. त्यानंतर शनिवारी सकाळी बेडवर झोपलेले वानर हे डॉक्टरांच्या घरात आले आणि घरातील सोप्यावर झोपून राहिले डॉक्टरांनी बराच वेळ माकडाला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र माकड झोपेतून उठण्याचे नाव घेत नव्हते, त्यानंतर डॉक्टरांनी वन खात्याच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली.
वनरक्षक राजीव जाधव हे घरी पोहोचताच माकडाने झोपेतून खाडकन उठून त्यांना मिठी मारली आणि त्यांच्या खांद्यावर जाऊन बसले विशेष म्हणजे जाधव यांनी वानराला जीपमध्ये बसण्यास सांगितले तेव्हा वानर देखील जीपच्या मागच्या सीटवर जाऊन बसले त्यानंतर या वानराला वेरूळच्या जंगलात सोडण्यात आले प्रत्येकाला लळा लागल्यामुळे वानर गावातून जाताना नागरिकांना वाईट वाटत होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Top trending, Videos viral, Viral news