Home /News /national /

'मशीद हीच मृत्यूसाठी योग्य जागा', असं म्हणणारे तबलिगीचे मौलाना साद कुठे आहेत?

'मशीद हीच मृत्यूसाठी योग्य जागा', असं म्हणणारे तबलिगीचे मौलाना साद कुठे आहेत?

मशीद हीच मरण्यासाठी योग्य जागा, असं सांगणारे मौलाना साद निजामुद्दीनच्या तबलिगी मरकजचे आयोजक आहेत. त्यांची दुसरी ऑडिओ क्लिप आज समोर आली.

    नवी दिल्ली, 2 एप्रिल : भारताच्या कोरोनाव्हायरसच्या संक्रमणाचा हॉटस्पॉट ठरलेलं दिल्लीतल्या निजामुद्दीनचं मरकज ज्यांनी आयोजित केलं त्यांचं नाव मौलाना साद कंधालवी. तबलिगी जमातचं संमेलन त्यांनी निजामुद्दीनला भरवलं. या तबलिगी जम्मातच्या मरकजमुळे आतापर्यंत 400 जण कोरोनाबाधिक झाले आहेत. या मौलवींच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केली आहे. पण मौलाना अजून गायब आहेत. 28 तारखेला ते शेवटी दिसले होते. पण त्यानंतर ते कुठे गेले, हे पोलिसांना माहिती नाही. त्यांची ऑडिओ क्लिप मात्र समोर आली आहे. मौलाना साद हे या तबलिगी जम्मातचे प्रमुख आहेत. त्यांच्या मरकजसाठी हजारो तबलिगीपंथीय त्या एका मशिदीत जमले होते आणि तिथेच अनेक दिवस राहिले. त्यात अनेक जण विदेशातून पर्यटन व्हिसावर आलेलेही होते. त्यातून कोरोनाव्हायरसचा प्रसार देशभर होत आहे. बापरे! ‘तबलिगी जमात’मुळे तब्बल 400 जणांना कोरोना, देशभर पडला विळखा हे मौलाना साद अजून दिल्ली पोलिसांपर्यंत पोहोचलेले नाहीत. पण एक ऑडिओ क्लिप बुधवारी रीलिज झाली. त्यामध्ये 'मशीदच मृत्यू यावा, हे भाग्य. कोरोनाव्हायरची साथ ही अल्लाहने दिलेली शिक्षा आहे', या अर्थाचा संदेश त्यांनी दिला होता. त्यानंतर गुरुवारी दुपारी त्यांची आणखी एक क्लिप समोर आली. त्यामध्ये त्यांनी आपल्या तबलिगी बांधवांना हुकूमतला (सरकार)सहकार्य करण्याचं आवाहन करत, आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला. आपण स्वतः आयसोलेशनमध्ये आहोत, असं त्यांनी जाहीर केलं आहे. काय आहे मरकज आणि का जमले होते हजारो? मरकज निजामुद्दीन इथे हजारो तबलिगी मुस्लीम जमले होते, ती इमारत साधारण 100 वर्षं जुनी आहे. ते तबलिगींचं मुख्य केंद्र मानलं जातं. मौलाना साद याच इमारतीत असतात. पण या इमारतीला सील केल्यानंतर मौलाना कुठे आहेत याचा पत्ता पोलिसांना अद्याप लागलेला नाही. काय आहे तबलिगी जमात? इस्लाम धर्माचा त्याच्या पारंपरिक रूपात प्रचार करण्याचं काम तबलिगी जम्मात करतं.तब्लिगी जम्मातला मानणारे जवळपास 15 कोटी मुस्लीम जगभरात आहेत. Coronavirus : कम्युनिटी ट्रान्समिशनचा सामना करण्यासाठी सज्ज राहा - WHO मुख्यतः दक्षिण आशियात त्यांची उपस्थिती असली, तरी जगभरातल्या 180 देशांमध्ये तब्लिगी जम्मात पोहोचलेली आहे. जमातचे प्रचारक प्रांतोप्रांती फिरून हे काम करतात. प्रेषित मोहम्मदांच्या काळातला इस्लाम आत्ता असायला हवा, असा आग्रह धरत हा प्रसार होतो. त्यासाठी वेळोवेळी प्रचारकांची शिबिरं घेतली जातात. असंच एक मोठं शिबिर दिल्लीत आयोजित केलं गेलं होतं. तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना साद हे याचे प्रमुख होते. मौलाना साद यांना हे पद पिढीजात मिळालं आहे. त्यांच्या आजोबांनीच या तबलिगी जम्मातची स्थापना केली. जगात कोरोना व्हायरसचं संक्रमण वाढत असताना अनेक देशांत या जमातीच्या शिबीरांचं आयोजन केलं जात होतं. मलेशिया आणि इंडोनेशिया सारख्या देशांचा यात समावेश आहे. गृहमंत्रालयाची कारवाई या कार्यक्रमासाठी 1306 विदेशी मौलाना भारतात आले होते. सगळ्यांना पर्यटक व्हिसा मिळाला होता. या व्हिसावर आलेल्यांना धर्म प्रचार आणि प्रसारासाठी कुठलंही काम करता येत नाही. त्यामुळे त्यांनी व्हिसाच्या नियमाचं उल्लंघन केल्याचं स्पष्ट झालं होतं त्यामुळे गृहमंत्रालयाने ही कारवाई केली आहे. अन्य बातम्या Coronavirus च्या निदानासाठी लवकरच ब्लड टेस्ट, भारतातील रुग्णांचा खरा आकडा समजणार 10 दिवस श्वासाशी संघर्ष; तरुणाने जिंकला कोरोनाविरोधात लढा, म्हणाला...
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या