Coronavirus च्या निदानासाठी लवकरच ब्लड टेस्ट, भारतातील रुग्णांचा खरा आकडा समजणार

Coronavirus च्या निदानासाठी लवकरच ब्लड टेस्ट, भारतातील रुग्णांचा खरा आकडा समजणार

कोरोनाव्हायरसचं (Coronavirus) निदान करण्यासाठी सिरोलॉजिकल टेस्ट (serological test) म्हणजे रक्तचाचणी (blood test) केली जाण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 एप्रिल : भारतात (India) कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) निदानासाठी आता रक्तचाचणी (Blood tets) केली जाणार आहे. ज्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा खरा आकडा समजणार आहे. विशेष म्हणजे 30 मिनिटांतच या टेस्टचा रिपोर्ट येणार आहे.

इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने (ICMR) सिरोलॉजिकल टेस्टसाठी (blood Serological tests) 15 लाख अँटिबॉडी किट्ससाठी कोटेशन मागवलं होतं. 5 एप्रिलपर्यंत हे किट्स मिळणार आहेत. त्यानंतर 6 एप्रिलपासून ब्लड सिरोलॉजिकल टेस्ट सुरू होईल. ही ब्लड प्लाझ्मा टेस्ट आहे. ज्याचा रिपोर्ट 30 मिनिटांपेक्षाही कमी वेळात मिळेल.

या किट्सचा उपयोग रिसर्च, मॉनिटरींग आणि तपासणीसाठी होऊ शकतो. रक्तातील अँटिबॉडीजमुळे किती लोकं व्हायरसच्या संपर्कात आलेत आणि किती जणांमध्ये व्हायरसला प्रतिकार करणारी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली आहे, ते समजू शकेल.

काय आहे सिरोलॉजिकल टेस्ट?

शरीरात एखाद्या व्हायरसने किंवा पॅथोजनने हल्ला केल्यानंतर शरीर त्याच्याशी लढतं. पॅथोजनला अँटिजनही म्हणतात.  हे फॉरेन पार्टिकल म्हणजे शरीराच्या बाहेरील घटक असतात, ज्यांनी शरीरात प्रवेश केल्यानंतर शरीरात अँटिबॉडीज तयार होतात आणि या अँटिबॉडीज पॅथोजनवर हल्ला करतात. आणि त्यांना कमजोर बनवतात त्यामुळे आपण निरोगी राहतो आणि म्हणूनच एकदा झालेला आजार पुन्हा झाल्यास आपल्यावर त्याचा परिणाम कमी होतो.

हे वाचा - भारतातील Coronavirus बाबत नवी माहिती समोर, तज्ज्ञ म्हणाले...

सिरोलॉजिकल टेस्टमधून याच अँटिबॉडीजबाबत माहिती मिळते.  ही रक्तचाचणी आहे. जॉन हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या (John Hopkins Bloomberg School of Public Health) मते, एखादी व्यक्ती व्हायरसच्या संपर्कात आली की नाही हे तपासण्यासाठी ही टेस्ट असते. यामध्ये रक्तातील सिरम घेतलं जातं, ज्यामध्ये लाल आणि पांढऱ्या रक्तपेशी नसतात. रक्तातील सिरमची चाचणी केली जाते आणि त्यामध्ये काही अँटिबॉडीज आहेत का हे पाहिलं जातं. या अँटिबॉडीज एखादा पॅथोजन असल्यावर तयार होतात.  व्हायरसचा संसर्ग झाल्यास सिरोलॉजिकल टेस्टमार्फत रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती एखाद्या विशेष पॅथोजनवर प्रतिक्रिया देते आहे की नाही हे तपासलं जातं.

सध्या जगभरात रिअल टाइम polymerase chain reaction (PCR) आधारित तपासणी कोरोना पॉझिटिव्हची पुष्टी देण्याचा पहिला मार्ग आहे. याला Real-time polymerase chain reaction किंवा क्वांटिटेटिव चेन रिअॅक्शनही म्हटलं जातं. यात रियल टाइममध्ये डीएनएची (DNA) तपासणी केली जाते.  यामध्ये संशयित रुग्णाच्या नाक आणि घशातील नमुने घेतले जातात आणि त्यांची जेनेटिक तपासणी केली जाते.

रिअल टाइम PCR मध्ये रुग्ण बरा झाल्यानंतरही त्याच्यामध्ये व्हायरस असतील की नाही, शिवाय एखाद्याच्या शरीरात व्हायरस असल्यानंतरही त्याच्यात लक्षण दिसत नसतील तर व्हायरसचं निदान होत नाही. मात्र सिरोलॉजिकल टेस्टच्या मदतीने हे समजू शकतं. शरीरातील अँटिबॉडीज हे सांगण्यासाठी मदत करतात.

हे वाचा - 10-15 वर्षांआधीच माणसांमध्ये पसरला Coronavirus, आता घेतोय जीव; धक्कादायक संशोधन

First published: April 2, 2020, 8:31 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading