Home /News /national /

10 दिवस श्वासाशी संघर्ष; तरुणाने जिंकला कोरोनाविरोधात लढा, म्हणाला...

10 दिवस श्वासाशी संघर्ष; तरुणाने जिंकला कोरोनाविरोधात लढा, म्हणाला...

10 दिवस जीवनमृत्यूशी झुंज दिल्यानंतर बिहारमधील (Bihar) तरुणानं कोरोनाविरोधात लढा जिंकला आहे आणि इतरांनाही त्यानं बळ दिलं आहे.

    पटना, 02 एप्रिल : कोरोनाव्हायरसची (Coronavirus) धास्ती सर्वांनीच घेतली आहे. ज्यांना या व्हायरसची लागण झाली आहे, त्यांनी तर जगण्याची आशाच सोडली आहे. कोरोनामुळे मानसिकरित्या खचलेल्या अशाच सर्वांसाठी बिहारमधील (bihar) एक तरुण आशेचा किरण ठरला आहे. 10 दिवस जीवनमृत्यूशी झुंज दिल्यानंतर तरुणानं कोरोनाविरोधात लढा जिंकला आहे आणि इतरांनाही त्यानं बळ दिलं आहे. पटनातील (patna) एनएमसीएच रुग्णालयातून रवी कुमार (नाव बदललेलं) याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता त्याला होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. रवी मार्चमध्ये स्कॉटलंडहून भारतात परतला. त्याची तब्येत बिघडू लागली. 20 मार्चला त्याला पटनातील एम्समध्ये दाखल करण्यात आलं. सर्दी, खोकला, ताप असल्याने 21 मार्चला त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली. रवीला कोरोनाव्हायरस असल्याचं निदान झालं. यानंतर रवीला 22 मार्चला एनएमसीएचमधील संसर्गजन्य आजारासाठी असलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिथं 10 दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. हे वाचा - कोरोनाला हरवणं शक्य आहे! व्हेंटिलेटरवर राहिलेल्या महिलेनं सिद्ध केलं गेल्या 4-5 दिवसांपासून त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यानंतर एनएमसीएचच्या डॉक्टरांनी त्याची कोरोना टेस्ट केली आणि टेस्ट नेगेटिव्ह आली. पुन्हा 2 दिवसांनी चाचणी करण्यात आली. चाचणीचा दुसरा रिपोर्टही नेगेटिव्ह आला. दोन्ही कोरोना टेस्टचे रिपोर्ट नेगेटिव्ह आल्यानंतर रवीला रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे. आता 14 दिवस तो होम क्वारंटाइन आहे. रवी कुमारने अखेर कोरोनाविरोधातील लढा जिंकला आहे. त्यानंतर त्यांनं इतरांनाही जगण्याचं बळ दिलं आहे. राहुल म्हणाला, सामान्य लोकांनी कोरोनाव्हायरसला बिलकुल घाबरू नका आणि ज्यांना या व्हायरसची लागण झाली आहे, त्यांनी याचा बिनधास्तपणे सामना करा कोरोना पीडीत रुग्णांनी संयम बाळगावा. तसंच डॉक्टर जे सल्ला देत आहेत, त्याचं तंतोतंत पालन करा, असं आवाहनही रवीने केलं आहे. हे वाचा - कोरोनाच्या लढ्यात डॉ. प्रकाश आमटे सरसावले, योद्ध्यांसाठी मास्कची निर्मिती रवीने कोरोनावर मात केल्यानंतर फक्त त्यालाच नाही, तर रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनाही याचा आनंद झाला आहे. एनएमसीएच कोरोना रुग्णालयाचे नोडल पदाधिकारी डॉ. अजय कुमार सिन्हा यांनी सांगितलं की, "जर कोरोनाग्रस्त व्यक्ती योग्य वेळेत आला तर त्याच्यावर योग्य उपचार सुरू होतात आणि तो बरा होण्याची शक्यता वाढते" रवीप्रमाणे देशातील अनेकांनी महाभयंकर कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 132 रुग्णांवर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाव्हायरसला हरवणं शक्य आहे, हे या सर्वांनी दाखवून दिलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या