नवी दिल्ली, 03 ऑगस्ट: भाजपविरोधात विरोधी पक्षातील नेते एकवटण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विरोधी पक्षांना एकत्र करत मोदी सरकारला (Modi Government) घेरण्यासाठी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. राहुल गांधी यांनी देशातील विरोधी पक्षांच्या खासदारांची एक बैठक बोलावली होती, या बैठकीत 14 पक्षांचे जवळपास 100 खासदार उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे. राहुल गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, आप, नॅशनल कॉन्फरन्स, भाकप, माकप, राजद पक्षांच्या राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांचा समावेश आहे.
यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना (PM Narendra Modi) 'चाय पे चर्चा' (Chai Pe Charcha) वरुन टोला लगावण्याची संधी सोडली नाही. या बैठकीतील एक Inside Video समोर आला आहे.
हे वाचा-BREAKING : पठाणकोटमध्ये भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं
यावेळी संजय राऊत असं म्हणाले की, 'जर पंतप्रधानांनी चाय पे चर्चासाठी बोलावलं तर अवश्य जाऊ. पण पंतप्रधानांनी आम्हाला बोलवायला हवं. आम्हाला तर कुणी पाणी देखील विचारत नाही. ते तर सर्वांचे पंतप्रधान आहेत.'
View this post on Instagram
(संबंधित व्हिडीओ विरोधी पक्षांच्या बैठकीतील असून यातील ऑडिओ काही प्रमाणात अस्पष्ट आहे)
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये मीटिंगसाठी राहुल गांधी यांनी 14 विरोधी पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केले होते. यामध्ये राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सदनातील खासदारांचा समावेश आहे. या बैठकीत सर्व नेते सभागृहातील उपस्थित होणाऱ्या मुद्द्यांबाबत सरकारवर दबाव वाढवण्याच्या मार्गावर चर्चा करतील.
Delhi: Opposition Party floor leaders from Lok Sabha & Rajya Sabha attend a breakfast meeting called by Congress leader Rahul Gandhi.
Aam Aadmi Party (AAP) is skipping the meeting. pic.twitter.com/iPHOmI3GTQ — ANI (@ANI) August 3, 2021
संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पहायला मिळत आहे. विविध मुद्द्यांवरुन विरोधक मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. विरोधकांच्या गोंधळामुळे वारंवार संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब करावे लागत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: PM narendra modi, Sanjay raut