नवी दिल्ली 03 ऑगस्ट : पठाणकोटमधील रणजित सागर धरणाजवळ भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं (Chopper Crashed in Ranjit Sagar Dam) आहे. पोलीस आणि सैन्याची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. ही घटना 3 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजून 20 मिनिटाच्या सुमारास घडली. वैमानिक आणि सह-वैमानिक दोघंही या अपघातातून बचावले आहेत. एनडीआरएफच्या टीमसह पोलीस याठिकाणी बचावकार्य करत आहेत. ढिगारा हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जम्मू-काश्मीर पोलीस, एनडीआरएफ आणि पंजाब पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली आहे.
BREAKING : पठाणकोटमध्ये भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं pic.twitter.com/qw2nPfljyX
— News18Lokmat (@News18lokmat) August 3, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crash, Helicopter, Indian army