राम मंदिराप्रमाणे बाबरी मशिदीसाठी ट्रस्ट स्थापन करावं, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

राम मंदिराप्रमाणे बाबरी मशिदीसाठी ट्रस्ट स्थापन करावं, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

आयोध्येत राम मंदिरासाठी ट्रस्ट उभारून आर्थिक मदत दिली जात आहे. पण बाबरी मशीद पाडली त्यासाठी सरकार काही मदत करत नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी उत्तर प्रदेशात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केलं.

  • Share this:

लखनऊ, 19 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशात विरोधी पक्षांना एका व्यासपीठावर आणून भाजपची कोंडी करण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार करत आहेत. बुधवारी लखनऊ इथं झालेल्या कार्यक्रमावेळी शरद पवार यांनी देशाला धर्माच्या आधारे विभागलं जात असल्याचा आरोप केंद्रातील आणि उत्तर प्रदेशातील भाजप सरकारवर केला. यावेळी शरद पवार म्हणाले की, आयोध्येत राम मंद्रीसाठी ट्रस्ट उभारून आर्थिक मदत दिली जात आहे. पण बाबरी मशीद पाडली त्यासाठी सरकार काही मदत करत नाही. बाबरी मशिदीसाठीही ट्रस्ट तयार करून मदत करायला हवी.

राष्ट्रवादीच्या उत्तर प्रदेशातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी उत्तर प्रदेशच्या अर्थसंकल्पावर टीका केली. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काहीच नाही. बेरोजगारांसाठी मासिक प्रशिक्षण भत्ता देण्याची तरतूद केली पण तो मिळेल की नाही हे सांगणं कठीण असल्याचं म्हटलं.

उत्तर प्रदेशातील बेरोजगारीचे प्रमाण वाढत चालल्याचं शरद पवार म्हणाले. इथल्या तरुणांवर महाराष्ट्रासह दुसऱ्या राज्यांमध्ये जाण्याची वेळ आली आहे. भाजप सरकारच्या योजनांमुळे जनता त्रासली आहे. त्यामुळे आता त्यांच्या हातातून राज्ये निसटत चालली आहेत. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री यांनी प्रचार करूनही दिल्ली भाजपला जिंकता आली नाही. केजरीवालांसमोर त्यांचा निभाव लागला नाही असं शरद पवार म्हणाले.

भाजपकडून फोडा आणि राज्य करा नीती वापरली जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. आता जनतेला त्यांचे डाव समजले आहेत. त्यांच्या बोलण्यात लोक अडकणार नाहीत. सीएए आणि एनआरसीमध्ये अनेक त्रुटी आहेत. यात अल्पसंख्यांक असलेल्या मुस्लिमांकडे दुर्लक्ष केल्याचंही शरद पवार यांनी सांगितले.

वाचा : 'भाजप आमदारासह 7 जणांनी बलात्कार केला', महिलेच्या आरोपानंतर गुन्हा दाखल

First published: February 19, 2020, 9:22 PM IST

ताज्या बातम्या