Home /News /crime /

'भाजप आमदारासह 7 जणांनी बलात्कार केला', महिलेच्या आरोपानंतर गुन्हा दाखल

'भाजप आमदारासह 7 जणांनी बलात्कार केला', महिलेच्या आरोपानंतर गुन्हा दाखल

उत्तर प्रदेशात 2017 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजप आमदारासह त्यांच्या कुटुंबातील इतर 6 जणांनी बलात्कार केल्याचा आरोप महिलेनं केला आहे.

    भदोही, 19 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशातील भदोही मतदारसंघातील भाजप आमदार रविंद्रनाथ त्रिपाठी यांच्यासह 7 जणांवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. बलात्काराचा आरोप एका विधवा महिलेनं केला असून तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीवेळी भदोही इथल्या एका हॉटेलमध्ये बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. वाराणसीत राहणाऱ्या पीडित महिलेने काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. 2017 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजप आमदार रविंद्रनाथ त्रिपाठी यांचा पुतण्या संदीपने तिला मुंबईहून भदोहीला बोलावलं होतं. तिथल्या एका हॉटेलमध्ये काही दिवस तिला ठेवलं होतं. या हॉटेलमध्ये भाजप आमदार रविंद्रनाथ त्रिपाठी यांनी बलात्कार केला. याशिवाय त्यांचा पुतण्या आणि मुलांनीही वेगवेगळ्या दिवशी बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेनं केला. महिलेनं लिहिलेल्या पत्रात सांगितलं की 2014 मध्ये आमदार रविंद्रनाथ त्रिपाठी यांच्या पुतण्याशी तिची ओळख मुंबईला जाताना झाली होती. ट्रेनमध्ये मैत्री झाल्यानंतर दोघांनी एकमेकांना त्यांचे नंबर दिले होते. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून आमदाराच्या पुतण्याने  अनेक वर्षे शारीरिक शोषण केलं. त्यानंतर 2017 मध्ये उत्तर प्रदेशातील विधानसबा निवडणुकीवेळी आमदार त्रिपाठी यांचा पुतण्या संदीपने तिला मुंबईहून भदोही इथं बोलावलं. त्यानंतर अनेक दिवस भदोहीतल्या हॉटेलमध्ये आपण राहिल्याचं महिलेनं सांगितलं. वाचा : 15 व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या, सापडली 2 ओळींची सुसाईड नोट महिलेनं आरोप केला की, हॉटेलमध्ये तिच्यावर आमदार रविंद्रनाथ त्रिपाठी आणि त्यांच्या कुटुंबातील सहा जणांनी बलात्कार केला होता. या तक्रारीनंतर पोलिसांनी 376 डी, 313, 504 आणि 506 या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. भदोहीचे पोलि अधीक्षक राम बदन सिंग यांनी सांगितले की, आमदारांसह इतर लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत. तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितले. वाचा : 'दोन महिन्यांपूर्वी प्रियकराला मारून पुरलं आता स्वप्नात छळतोय, त्याला बाहेर काढा
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: BJP, Uttar pradesh

    पुढील बातम्या