मराठी बातम्या /बातम्या /देश /

मोठी बातमी, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू

मोठी बातमी, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दिल्लीत बैठक सुरू

मागील आठवड्यातच प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांच्या निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथे जाऊन भेट घेतली होती.

मागील आठवड्यातच प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांच्या निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथे जाऊन भेट घेतली होती.

मागील आठवड्यातच प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांच्या निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथे जाऊन भेट घेतली होती.

  • Published by:  sachin Salve

नवी दिल्ली, 21 जून: काही दिवसांपूर्वी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor)आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट झाल्यामुळे राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची दिल्लीत भेट झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीमध्ये पोहोचले आहेत. शस्त्रक्रियेनंतर गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुंबईतील निवासस्थानी विश्रांती घेतली आणि त्यानंतर ते दिल्लीत दाखल झाले. आगामी 23 जूनपर्यंत राजधानीमध्येच ते असणार आहेत. शरद पवार यावेळी देशातील राजकीय स्थितीवर तसंच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाविरोधात विरोधकांना एकत्र आणत रणनीती आखण्यासंबंधी विरोधी पक्षातील नेत्यांची भेट घेऊन चर्चा करण्याची शक्यता आहे.

आज प्रशांत किशोर शरद पवार यांच्या दिल्लीतील निवास्थानी पोहोचले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होत आहे. राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीमुळे या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Online Financial Fraud झालाय? घाबरू नका, वाचा पैसे परत मिळवण्यासाठी काय कराल

मागील आठवड्यातच प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांच्या निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथे जाऊन भेट घेतली होती. तब्बल 3 तासही बैठक सुरू होती. या बैठकीत देशासह राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. देशभरात नव्याने रणनीती आखण्यात यावी, यासाठी काय नियोजन केले जावे, महाराष्ट्र विधानसभेत कशा पद्धतीने रणनीती आखली जावी, यावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे, प्रशांत किशोर यांच्यासोबत राज्यात रणनीती आखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहमती दर्शवली असल्याची माहिती समोर आली.  महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत कशा पद्धतीने नियोजन करावे, काय समीकरण आखले जावे, मतदारसंघनिहाय कसे नियोजन असावे, याबद्दलही किशोर यांनी भाष्य केले.

या मुद्यांवर झाली होती चर्चा?

देशपातळीवर विरोधकांकडे एक आश्वासक चेहऱ्याची गरज आहे. त्यासाठी सामूहिक नेतृत्व आणावे लागणार आहे. याआधी राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यात लढत पाहण्यास मिळाली. पण, आता परिस्थितीत बदलली असून असं चित्र पुन्हा पुढे येऊ नये, यावरही या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली.

‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला

आतापर्यंत झालेल्या अनेक निवडणुकींमध्ये ज्या भागात कमी शिक्षण झाले आहे, एससी आणि एसटीसाठी मतदारसंघ आहे, अशा ठिकाणी भाजपला जास्त मतं मिळाली आहे, अशी वस्तूस्थितीही किशोर यांनी मांडली. भाजपविरोधात भूमिका घेणाऱ्या पक्षांसोबत बोलून मोट बांधावी लागणार आहे. ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, आंध्र प्रदेशचे जगनमोहन रेड्डी आणि तेलंगणाचे चंद्रशेखर राव हे मोदींच्याविरोधात ठाम भूमिका मांडतात. प्रशांत किशोर हे लवकरच जगमोहन रेड्डी यांच्याशी बोलणार आहे. तर शरद पवार हे इतर दोन्ही नेत्यांशी बोलणार आहे.

ज्या ठिकाणी प्रादेशिक पक्ष आहेत त्या ठिकाणी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना जास्त जागा सोडल्यामुळे भाजपलाच फायदा झाला.  त्यामुळे स्थानिक पक्षांचे नुकसान झाले. उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत असंच चित्र पाहण्यास मिळालं होतं, त्यामुळे योग्य ते नियोजन करावे लागले, असंही किशोर यांनी मत नोंदवलं होतं.

First published:

Tags: Meeting, Sharad pawar