• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • अफगाणिस्तानच्या अध्यक्षांचा भाऊ निघाला घरभेदी, तालिबानशी केली हातमिळवणी!

अफगाणिस्तानच्या अध्यक्षांचा भाऊ निघाला घरभेदी, तालिबानशी केली हातमिळवणी!

अफगाणिस्तानात तालिबान राजवट येताच निर्वासित अध्यक्ष अश्रफ गनी (Ashraf Ghani) यांनी देश सोडून पलायन केले. त्यापाठोपाठ आता त्यांच्या भावानंही देशाला धोका दिला आहे.

 • Share this:
  काबूल, 21 ऑगस्ट : अफगाणिस्तानात तालिबान राजवट येताच निर्वासित अध्यक्ष अश्रफ गनी (Ashraf Ghani) यांनी देश सोडून पलायन केले. त्यापाठोपाठ आता त्यांच्या भावानंही देशाला धोका दिला आहे. हशमत गनी  (Hashmat Ghani) यांनी कथित स्वरुपात तालिबानशी हातमिळवणी केली आहे. याबाबतच्या रिपोर्टनुसार हशमत गनी यांनी तालिबानी नेता खलील-उर-रहमान आणि धार्मिक नेता मुफ्ती महमूद झाकीर यांच्या उपस्थितीमध्ये तालिबानला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. अश्रफ गनी सध्या त्याच्या कुटुंबीयांसोबत यूएईमध्ये आहे. काबूल न्यूजनं दिलेल्या माहितीनुसार गनी यांचा सध्या आबूधाबाीमधील हॉटेलमध्ये मुक्काम आहे. ते पहिल्यांदा तझाकिस्तानमध्ये गेले होते. पण तिथे त्यांच्या विमानाला लँडींग मिळाली नाही. 'आपल्याकडं देश सोडण्यावाचून कोणताही पर्याय नव्हता. आपण भविष्यातही देशाच्या विकासासाठी योगदान देत राहू', असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. काबूल सोडताना 15 ऑगस्ट रोजी घनी यांनी चार कार आणि एक हेलिकॉप्टर भरुन पैसा देशाबाहेर नेला, असा त्यांच्यावर आरो करण्यात आला आहे. रशियन दुतावासाचे प्रवक्ते निकिता इशचेंको यांनी केला आहे. गनी देशाबाहेर जात असताना चार कार पैशांनी भरल्या होत्या. त्यांनी ते सर्व पैसे हेलिकॉप्टरमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. पण त्यामधील काही पैसे खाली पडले असा इशचेंको यांचा आरोप आहे. गनी यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. अफगाणिस्तानावर पकड मजबूत करण्यासाठी तालिबानची नवी युक्ती अफगाणिस्तानचे उपाध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांनी स्वत:ला काळजीवाहू अध्यक्ष घोषित केले आहे. त्यांनी ट्विट करत ही माहिती दिलीय. अध्यक्ष अनुपस्थित असतील, त्यांनी राजीनामा दिला असेल अथवा त्यांचा मृत्यू झाला असेल तर उपाध्यक्ष हे काळजीवाहू अध्यक्ष बनतात, असे त्यांनी म्हंटले आहे. तालिबान विरुद्धची लढाई अद्याप संपली नसल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. सालेह सध्या पंजशीर प्रांतामध्ये असून तिथून ते युद्धाची तयारी करत आहेत, असं मानलं जात आहे.
  Published by:News18 Desk
  First published: