जाहिरात
मराठी बातम्या / देश / गाडीने उडवायचं? किंवा तू विष देऊन मार! ज्योती मौर्य प्रकरणात थरारक ऑडिओ समोर

गाडीने उडवायचं? किंवा तू विष देऊन मार! ज्योती मौर्य प्रकरणात थरारक ऑडिओ समोर

ही ऑडिओ खरी असल्यास दोघांनी मिळून आलोक मौर्य यांच्या खुनाचा प्लॅन आखला होता, हे स्पष्ट झालं आहे.

ही ऑडिओ खरी असल्यास दोघांनी मिळून आलोक मौर्य यांच्या खुनाचा प्लॅन आखला होता, हे स्पष्ट झालं आहे.

आलोक मौर्य यांनी मनीष दुबे यांच्या विरोधात होमगार्ड विभागात एक लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मनीष दुबे यांना होमगार्ड जिल्हा कमांडंट पदावरून निलंबित केल्याचं बोललं जातंय.

  • -MIN READ Local18 Lucknow,Uttar Pradesh
  • Last Updated :

लखनऊ, 15 जुलै : बायको शिकली आणि सोडून गेली, अशा अनेक कथा सध्या ऐकायला मिळत आहेत. या कथा समोर येण्याची सुरुवात झाली ती, उत्तर प्रदेशचं ज्योती मौर्य आणि आलोक मौर्य प्रकरण उघडकीस आल्यावर. हे प्रकरण सध्या देशभरात गाजतंय. त्याबाबत दिवसाआड समोर येणारी नवी माहिती प्रकरणाची धग आणखी तीव्र करतेय. उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) ज्योती मौर्य, त्यांचे पती आलोक मौर्य, जिल्हा होमगार्ड कमांडंट मनीष दुबे या व्यक्तींची नावं प्रकरणातून चर्चेत आली आहेत. काही दिवसांपूर्वी ज्योती मौर्य आणि त्यांचा कथित प्रियकर मनीष दुबे यांचं कथित चॅट समोर आलं होतं, तर आता दोघांची एक कथिक ऑडिओही समोर आली आहे. ही ऑडिओ खरी असल्यास दोघांनी मिळून आलोक मौर्य यांच्या खुनाचा प्लॅन आखला होता, हे स्पष्ट झालं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

व्हायरल ऑडिओमध्ये एका महिला आणि पुरुषाचा संवाद आहे. पुरुष महिलेला आलोक मौर्यला घटस्फोट देण्यास सांगतोय. ‘त्याच्यापासून लवकर वेगळी हो, म्हणजे आपल्याला एकत्र राहता येईल’, असं त्याने म्हटलंय. त्यावर महिला म्हणते, ‘प्रयत्न सुरू आहेत. हुंड्याची खोटी तक्रार दिली पण माहिती नाही त्यातून हा कसा वाचतोय.’ दरम्यान, आलोक मौर्य यांनी मनीष दुबे यांच्या विरोधात होमगार्ड विभागात एक लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मनीष दुबे यांना होमगार्ड जिल्हा कमांडंट पदावरून निलंबित केल्याचं बोललं जातंय, मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अडचणींचा सामना करत असाल तर…, ‘हा’ आहे चमत्कारी उपाय करून पाहा! ज्योती मौर्य आणि मनीष दुबे यांच्या कथित ऑडिओमध्ये नेमकं आहे तरी काय? महिला : हॅलो. पुरुष : हाय बेबी. महिला : कसे आहात? पुरुष : मी ठीक आहे. तुमचं काय चाललंय? महिला : काही नाही, काम करत होती यार. एवढ्या उशिरा का फोन केला? माझ्या आलोकजींना कळलं तर मग मला काही माहित नाही. पुरुष : अगं…तुझा नवरा! झोपला नाही का तो अजून? महिला : नाही जागा आहे अजून. मुलांजवळ आहे. पुरुष : मुलांजवळ आहे? यार तू मला कधीपासून बोलतेय की, त्याला घटस्फोट देशील. कधी देणार आहेस? तुझं काय चाललंय मला काही कळत नाही. महिला : यार मी बोलली आहे म्हणजे देणार आहे…तो देईल तेव्हाच. तो पण मला घटस्फोट देत नाहीये. सोशल मीडियावर एवढा ड्रामा करून ठेवलाय. याला तर असं वाटतंय ठार मारून टाकावं. काय काय नाही केलं, खोटी तक्रार दिली की हुंड्यासाठी त्याने मला मारलं पैशांसाठी. तरीपण कसा वाचतोय कळत नाही. पुरुष : तू यार माझं ऐक. मला सांग मी यात काय मदत करू? तू माझी आहेस आणि मला तू त्याच्यापासून वेगळी झालेली हवी बस्स. महिला : काय? पुरुष : मला तू माझ्यासोबत राहायला हवी आहेस आणि तुझा पती वेगळा व्हायला हवाय. यासाठी मी तुला काय मदत करू सांग. महिला : काय करायचं यार. याला ठार मारून टाकायचंय. कारण याचं तर काहीच नाहीये, त्यामुळे अजून काय काय करेल सांगू शकत नाही. म्हणून तो मरेल, तेव्हाच गोष्टी संपतील. बाकी, तू तुझ्या बायकोला कधी घटस्फोट देतोय? पुरुष : अच्छा! सांग, काय प्लॅन आहे? महिला : विचार करूया याला पोहोचवायचा. पुरुष : अच्छा, गाडीने उडवूया? महिला : नाहीतर काय? तो एकतर सकाळी कामावर जायला निघतो किंवा संध्याकाळी घरी येतो. तो घराबाहेर पडण्याच्या याच दोन वेळा आहेत आपल्याकडे. पुरुष : अच्छा, तुम्ही जेवलात? जेवण नसेल झालं तर, विष आहे ना? विष देऊन मारून टाक त्याला. महिला : यार विष मी कसं आणून ठेवेन. ते उंदीर मारण्याचं आहे पण त्याने तर हा मरणार नाही. पुरुष : अच्छा, नाही यार मरेल बरोबर उंदीर मारण्याचं औषध दिल्यावर. महिला : अरे नाही मरणार, कोणी असं नाही मरत. दरम्यान, याच ऑडिओच्या आधारे मनीष दुबे यांना निलंबित केल्याची चर्चा आहे. मात्र या चर्चेत तथ्य आहे की नाही याबाबत वृत्त नाही. परंतु या ऑडिओनंतर हे प्रकरण आणखी तापणार हे निश्चित.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात