ईशा बिरोरिया, प्रतिनिधी ऋषिकेश, 14 जुलै : श्रावण महिना महादेवांना समर्पित असतो, त्यामुळे तो शिवभक्तांसाठी अत्यंत खास मानला जातो. त्यातच यंदा अधिक मास असल्यामुळे भक्तांचा आनंद द्विगुणित झाला आहे. कारण अधिक मासामुळे आठ श्रावणी सोमवार पाळता येणार आहेत. तुम्हाला माहितीये का, श्रावणात महादेवांसह शनीची पूजा करणंही लाभदायी ठरतं. पंडित शुभम तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रावण महिन्यात महादेवांची विशेष पूजा केली जाते. त्यांच्यासह शनी देवालाही प्रसन्न करण्यासाठी हा महिना शुभ मानला जातो. ज्या व्यक्तींच्या पत्रिकेत शनी योग्य स्थितीत नसेल, त्याचं अशुभ स्थान असेल, अशा व्यक्तींनी शनी देवाला पुजायला हवं. शनी देव प्रसन्न झाल्यास हळूहळू या व्यक्तींच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील.
शुभम यांनी असंही सांगितलं की, श्रावण महिन्याच्या शनिवारी महादेवांना कच्च दूध अर्पण केल्यास आणि काळ्या कुत्र्याला तेल लावलेली चपाती खाऊ घातल्यास भक्तांना महादेवांसह शनीदेवही अर्पण होतात. परिणामी त्यांच्या आयुष्यात आनंदमयी घटना घडतात. विशेषतः रखडलेली कामं मार्गी लागतात. यंदा 2 दिवस साजरा होणार रक्षाबंधन? नक्की 30 की 31? जाणून घ्या मुहूर्त आपलीही काही कामं रखडली असतील, आपल्या जन्म पत्रिकेत शनी अशुभ स्थितीत असेल, आपल्याला शनीदोष असेल, आपण अडचणींचा सामना करत असाल तर येत्या श्रावणात महादेवांसह शनीदेवाचीही मनोभावे पूजा करा, असा सल्ला पुजाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, येत्या 18 जुलैपासून अधिक श्रावण मास सुरू होणार आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)