जाहिरात
मराठी बातम्या / देश / पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिकेतील 3 दिवसीय ऐतिहासिक दौऱ्यात नेमकं काय झालं?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिकेतील 3 दिवसीय ऐतिहासिक दौऱ्यात नेमकं काय झालं?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिकेतील 3 दिवसीय ऐतिहासिक दौऱ्यात नेमकं काय झालं?

तीन दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 76 व्या अधिवेशनाला संबोधित केले आणि पहिल्या प्रत्यक्ष क्वाड परिषदेला (Quad Summit) उपस्थित राहिले

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 26 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi in America) त्यांच्या अमेरिका दौऱ्याच्या समाप्तीनंतर शनिवारी भारतासाठी रवाना झाले. येत्या काही वर्षांमध्ये भारत-अमेरिका संबंध अधिक मजबूत होतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. तीन दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 76 व्या अधिवेशनाला संबोधित केले आणि पहिल्या प्रत्यक्ष क्वाड परिषदेला (Quad Summit) उपस्थित राहिले. याशिवाय मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस तसेच त्यांच्या ऑस्ट्रेलियन आणि जपानी समकक्षांबरोबर द्विपक्षीय आणि बहुपक्षीय कार्यक्रमांना उपस्थिती लावली. PM मोदींच्या India One विमानाची काय आहे खासियत? पाहा PHOTOS भारतात परतण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी ट्विट (PM Narendra Modi Tweet) केलं, की त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेत द्विपक्षीय आणि बहुपक्षीय कार्यक्रमांमध्ये भाग घेतला जो खूप फलदायी होता. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, गेल्या काही दिवसांमध्ये विविध मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि संयुक्त राष्ट्रांत संबोधन करण्याबरोबरच द्विपक्षीय आणि बहुपक्षीय कार्यक्रमांमध्ये भाग घेतला, जो खूप फलदायी होता. मला खात्री आहे की भारत-अमेरिका संबंध येत्या काही वर्षांमध्ये अधिक मजबूत होतील. आपल्या लोकांमधील समृद्ध संबंध हा आपला मजबूत वारसा आहे. पंतप्रधान मोदींनी अमेरिकेतील पाच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटून त्यांना देशात गुंतवणूक करण्याचे आमंत्रण दिले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. Explainer: भारताच्या अग्नी-5 क्षेपणास्त्रामुळे चीनची का वाढली धाकधूक? वाचा QUAD परिषदेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगाला मानवतेचा धडा शिकवला. या दरम्यान, पंतप्रधान मोदी म्हणाले की, जग कोरोना संकटाचा (Corona Crisis) सामना करत आहे, आपण कोरोनाच्या काळात मानवतेसाठी येथे एकत्र आलो आहोत. ते म्हणाले की, 2004 च्या त्सुनामीनंतर आपण इंडो-पॅसिफिक प्रदेशाला मदत करण्यासाठी एकत्र आलो. आज, जेव्हा जग कोविड महामारीला सामोरे जात आहे, तेव्हा आपण पुन्हा एकदा मानवतेच्या हितासाठी क्वाडच्या स्वरूपात एकत्र आहोत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात