मराठी बातम्या » फोटोगॅलरी » देश » PM Modi In America : पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेत घेऊन गेलेल्या India One विमानाची काय आहे खासियत? पाहा PHOTOS
PM Modi In America : पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेत घेऊन गेलेल्या India One विमानाची काय आहे खासियत? पाहा PHOTOS
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अमेरीका दौऱ्यासाठी त्यांचं खास विमान 'इंडिया वन'मधून (India One) अमेरिकेला गेले आहेत. हे विमान अतिशय खास आणि VIP सुरक्षा असलेलं विमान आहे. ज्याप्रमाणे अमेरिका आणि रशियाचे अध्यक्ष आपल्या विदेशी प्रवासासाठी विशेष विमान वापरतात, त्याचप्रमाणेच हे विमान खास पंतप्रधान मोदींसाठी बनवण्यात आले आहे. त्याबद्दल जाणून घेऊयात PHOTOS च्या माध्यमातून.
बुधवारी रात्री वॉशिंग्टनला जाताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi In Washington) एक फोटो ट्विट (Twitter) केला होता ज्यात ते अमेरिकेला जात असताना विमानात फाइल वाचत असल्याचं दिसत आहे. मोदींचं हे विमान अतिशय खास आहे.
2/ 9
बोईंग 777 मॉडेलचे एक नवीन विमान आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारताच्या सेवेत रूजू करण्यात आले होते. भारताने अमेरिकन बोईंग कंपनीकडून अशी दोन विमाने खरेदी केली आहेत. दोन इंजिनांचे हे विमान आहे. सध्या GE 90 इंजिन हे विमानात वापरले जाणारे सर्वात शक्तिशाली इंजिन आहे.
3/ 9
या विमानाच्या एका बाजूला हिंदी आणि दुसऱ्या बाजूला भारत असं लिहिलेलं आहे. त्याचबरोबर विमानावर अशोक चिन्ह कोरलेलं आहे. ते देशातील सर्वात सुरक्षित व्हीव्हीआय विमान आहे.
4/ 9
त्याचा वापर पंतप्रधानांव्यतिरिक्त राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती करू शकतात. सध्या एअर इंडिया आणि भारतीय हवाई दलाचे पायलट हे विमान चालवत आहेत.
5/ 9
एकदा इंधन भरल्यानंतर विमान 17 तासांपर्यंत उड्डाण करू शकते. यामध्ये आपत्कालीन परिस्थितीत हवेत इंधनही भरता येते. सुरक्षा आणि दळणवळण तंत्रज्ञानाच्या बाबतीत हे विमान अद्वितीय आहे.
6/ 9
यात अशी प्रणाली आहे जी केवळ विमान हल्ल्यापासून वाचवत नाही, तर त्या दिशेने येणाऱ्या क्षेपणास्त्राची दिशा बदलू शकते. त्यामुळे पंतप्रधानांना या विमानाच्या माध्यमातून मोठी सुरक्षा मिळते.
7/ 9
पूर्वी भारतात एअर इंडियाचे 747 जंबो विमान पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींसाठी विशेष विमान म्हणून वापरले जात होते.
8/ 9
विमानातील VIP लोकांच्या बसण्याची आणि त्यांच्या बैठकीसाठीही एक खोली आहे.
9/ 9
भारताने फेब्रुवारी 2020 मध्ये अमेरिकेशी दोन विशेष विमानांसाठी करार केला होता. जुलै 2020 पर्यंत ते भारताला मिळणार होते. पण कोरोनामुळे ते ढकलण्यात आले.