Explainer: भारताच्या अग्नी-5 क्षेपणास्त्रामुळे चीनची का वाढली धाकधूक? अशी वाढणार भारतीय लष्कराची ताकद

Explainer: भारताच्या अग्नी-5 क्षेपणास्त्रामुळे चीनची का वाढली धाकधूक? अशी वाढणार भारतीय लष्कराची ताकद

हे साधंसुधं मिसाइल नसून, एकापेक्षा अधिक अण्वस्त्रं घेऊन जाऊ शकणारं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 सप्टेंबर: भारताच्या महत्त्वाकांक्षी अग्नी-5 या क्षेपणास्त्राची (Agni-5 Missile test) चाचणी नुकतीच पार पडली. यावर सवयीप्रमाणे चीनने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये (UNGA) आगपाखड केली आहे. अर्थात, याला कारणही तसंच आहे. अग्नी-5 हे साधंसुधं मिसाइल नसून, एकापेक्षा अधिक अण्वस्त्रं घेऊन जाऊ शकणारं आणि 5000 किलोमीटरपर्यंतचं लक्ष्य (Agni-5 Range) भेदण्याची क्षमता असलेलं आहे. यामुळे अर्थातच चीनमधली (Agni-5 and China) कित्येक प्रमुख शहरं आता भारताच्या टप्प्यात आली आहेत.

गेल्या दशकभरापासून भारताचं पहिलं आयसीबीएम म्हणजेच इंटर-कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल (Inter Continental Ballistic Missile) असलेल्या अग्नी-5 वर संशोधन सुरू आहे. त्याच्या आतापर्यंत एकूण आठ चाचण्या पार पडल्या आहेत. जानेवारी 2018 मध्ये पाचवी चाचणी पार पडल्यानंतरच संरक्षण विभागाने (Defence Ministry India) या मिसाइलच्या मतेबाबत समाधान व्यक्त केलं होतं. अर्थात, लष्करामध्ये याचा समावेश करण्यासाठी आणखी चाचण्या आवश्यक होत्या. त्यामुळे मग त्याच वर्षी जून आणि डिसेंबरमध्ये आणखी दोन चाचण्या घेण्यात आल्या. यानंतर या मिसाइलची आठवी चाचणी (Agni-5 Tests) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली होती. ती चाचणी काही दिवसांपूर्वीच पार पडली. यानंतर आता सप्टेंबरअखेर आणि ऑक्टोबरमध्येही आणखी काही चाचण्या पार पडणार आहेत. या चाचण्या एमआयआरव्ही क्षमतेबाबत असणार आहेत, असं रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे.

एमआयआरव्ही काय आहे?

एमआयआरव्ही (MIRV) तंत्रज्ञानामुळे एक मिसाइल एकापेक्षा अधिक अण्वस्त्रं (Can carry multiple warheads) वाहून नेऊ शकतं आणि ती वेगवेगळ्या लक्ष्यांवर (Attack different targets) डागू शकतं. हे तंत्रज्ञान सर्वांत पहिल्यांदा 1960 साली अमेरिकेत तयार करण्यात आलं होतं. अमेरिकेतल्या सेंटर फॉर आर्म्स कंट्रोल अँड नॉन प्रोलिफेरेशनने (CACNP) याबाबत माहिती दिली.

हे वाचा - Explainer: एका दिवसात विकलं तब्बल 8.1 टन सोनं; सामान्यांवर काय होणार परिणाम?

विशेष म्हणजे या मिसाइलवरची विविध अण्वस्त्रं विविध टार्गेटवर एकाच वेळी हल्ला करू शकतात. या प्रत्येक अण्वस्त्राची दिशा आणि गती वेगवेगळ्या प्रकारे नियंत्रित करता येते. साधारणपणे 1500 किलोमीटर अंतरात असणारी विविध लक्ष्यं यातून भेदता येतात. अर्थात, यासाठी वापरण्यात येणारं तंत्रज्ञान हे अतिशय गुंतागुंतीचं (MIRV technology) असल्यामुळे अशा प्रकारचं मिसाइल तयार करणं सोपं नसतं, असंही CACNPने म्हटलं आहे. सध्या भारताच्या शेजारी असणाऱ्या पाकिस्तान आणि चीन दोन्ही देशांकडे अशा प्रकारची क्षेपणास्त्रं आहेत.

भारताकडची बॅलिस्टिक मिसाइल्स

न्यूक्लिअर थ्रेट इनिशिएटिव्हने दिलेल्या माहितीनुसार, भारताकडे कमी, मध्यम आणि लांब पल्ल्यांच्या क्षमतेची, जमिनीवरून मारा करणारी बॅलिस्टिक मिसाइल्स (Ballistic missiles of India) आहेत. यामध्ये पृथ्वी-2, अग्नी-1, अग्नी-2, अग्नी-3, अग्नी-4 अशा क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. यासोबतच भारताकडे पाणबुडीतून मारा करणारी क्षेपणास्त्रंही आहेत.

आर्म्स कंट्रोल असोसिएशन या अमेरिकेतल्या एका संस्थेने (Arms control association) दिलेल्या माहितीनुसार, बॅलिस्टिक मिसाइल्स ही रॉकेट पॉवर्ड मिसाइल्स (Rocket powered) असतात. डिसेंबर 2017पर्यंत जगातल्या 31 देशांकडे अशी मिसाइल्स होती. यातल्या केवळ 9 देशांकडे आण्विक शस्त्रं (nuclear capacities) असण्याची शक्यता किंवा तयार करण्याची तयारी आहे. यात चीन, फ्रान्स, भारत, इस्राइल, उत्तर कोरिया, पाकिस्तान, रशिया आणि अमेरिकेचा समावेश आहे.

चीनच्या पोटात का दुखतंय?

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा (UNGA) स्थायी सदस्य असलेला चीन कायमच या जागतिक मंचाचा वापर भारताच्या क्षेपणास्त्र चाचण्यांवर टीका करण्यासाठी करत आला आहे. अग्नी-5च्या नुकत्याच झालेल्या चाचणीनंतरही चीनने आपली ही परंपरा कायम ठेवली. दक्षिण आशियामध्ये शांतता कायम ठेवण्यासाठी सर्वच देशांनी समान प्रयत्न करायला हवेत. तसंच, भारतानं अण्वस्त्रं वाहून नेणारी बॅलिस्टिक मिसाइल्स तयार करताना UNSCR 1172 मधल्या अटी लक्षात ठेवाव्यात, असं काहीसं वक्तव्य चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजन यांनी केलं. UNSCR 1172 हा करार भारत आणि पाकिस्तानने 1998 साली केलेल्या आण्विक चाचण्यांनंतर (India-Pakistan nuclear tests) अस्तित्वात आला होता. यामध्ये दोन्ही देशांना आण्विक शस्त्रं बनवणं तातडीने थांबवण्याचे निर्देश देण्यात आले होते.

हे वाचा - सोप्या पद्धतीने मिळवा SBI Home Loan, एका क्लिकवर वाचा सविस्तर माहिती

अग्नी-5 च्या चाचणीनंतर चीनच्या पोटात दुखणारच होतं. याला पहिलं कारण म्हणजे अग्नी-5 या क्षेपणास्त्राची क्षमता. 5000 किलोमीटर्सची रेंज असल्यामुळे या मिसाइलच्या टप्प्यात चीनमधली प्रमुख शहरं सहजपणे येऊ शकतात. यासोबतच, अमेरिका आणि ब्रिटन या देशांनी ऑस्ट्रेलियासोबत केलेल्या करारामुळेही (AUKUS) चीन संतापला आहे. या करारानुसार ऑस्ट्रेलियाला आण्विक पाणबुड्या देण्यात येणार आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची पोहोच चीनच्या सागरी हद्दीपर्यंत वाढली आहे. याशिवाय ऑस्ट्रेलिया, जपान, भारत आणि अमेरिका क्वाड (QUAD) देशांच्या गटाक एकत्र आहेतच. यामुळे दक्षिण आशियात चीन एकटा पडला आहे आणि हेच चीनच्या नाराजीचं कारण आहे.

First published: September 25, 2021, 10:04 PM IST
Tags: chinaindia

ताज्या बातम्या