मुंबई, 9 मे : खासदार-आमदार राणा दाम्पत्य
(Rana Couple) दिल्लीला जाऊन गृहमंत्री आणि भाजपच्या इतर नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन केल्यावरुन राणांविरोधात राज्य सरकार कोर्टात जाणार असल्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल झालीय. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार
(Ajit Pawar) यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या अगदी काही मिनिटांत.
राणा दाम्पत्य दिल्लीला जाणार
खासदार नवनीत राणा यांना रविवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. राणा दाम्पत्य आता दिल्लीला जाणार आहे. गृहमंत्री अमित शाह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या घेणार भेट घेणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.
नवनीत राणा यांच्याविरोधात राज्य सरकार कोर्टात जाणार
खासदार नवनीत राणा यांनी जामिनाच्या शर्थीचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्य सरकार सत्र न्यायालयात कोर्टाची अवमानना केल्याबद्दल अर्ज दाखल करू शकतात.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची कोर्टाला विनंती
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी परवानगी द्यावी आणि घरचे अन्न मिळावे या मागणीच्या अर्जावर मुंबईतील विशेष न्यायालयात सुनावणी होणार आहे.
मुंबईतल्या रेल्वे स्थानकांवर दर महागला
रेल्वे प्रशासनाने मुंबई आणि उपनगरातील काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर पुढच्या 15 दिवसांसाठी रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट हे 50 रुपये इतकं केलं आहे.
सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
राज ठाकरेंविरोधात मुंबई उच्च न्यायालयत जनहित याचिका
मनसे नेते राज ठाकरे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयत जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. मुख्य न्यायमूर्ती यांच्या खंडपीठाने सुट्टी कालीन न्यायालयात सुनावणीसाठी याचिकाकर्त्यांना सांगितले होते.आज याचिकाकर्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन न्यायालयात सुनावणीची मागणी करू शकतात.
अजितदादांचा राज ठाकरेंना थेट सवाल
'आता हे अयोध्येला चालले आहे. पण यांनी आधी यूपी-बिहारच्या लोकांना मारून काय साध्य केलं. भोंगे या अगोदर दिसले नाहीत का? यांच्या या भूमिकेने साई मंदिरातील काकड आरती बंद झाली, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) यांच्यावर निशाणा साधला.
सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
नवनीत राणांविरोधात बोलताना चंद्रकांत खैरेंची जीभ घसरली
नवनीत राणा यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. त्यांच्या टीकेवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांना प्रश्न विचारला असता त्यांची जीभ घसरली. त्यांनी नवनीत राणा यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत सडकून टीका केली.
सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
महाराष्ट्राच्या सेंद्रिय शेतीचा देशात डंका
सेंद्रिय शेतीची (organic farming) वाटचाल आश्वासक असून देशात सेंद्रिय उत्पादनात राज्याचा दुसरा क्रमांक आहे, अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली. परंपरागत शेती सोबतच कृषी विभागातर्फे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. सेंद्रिय शेतीच्या प्रमाणिकरणासाठी अनेक विभागांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे कृषी मंत्री दादा भुसे (farmer minister dada bhuse) यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार (sharad pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ
देशासह राज्यभरात मागच्या आठवड्यापासून कडाक्याच्या उन्हाचा तडाखा बसत आहे. दरम्यान अशातच चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. आसनी चक्रीवादळ पुढच्या 24 तासात धडकण्याची शक्यता आहे. (Asani Cyclone) आज (दि. 08) रविवारी, बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) आग्नेय भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या दाबामुळे आसानी चक्रीवादळ तीव्र झाले आहे. मागच्या 6 तासांत 16 किमी प्रतितास वेगाने पश्चिम-वायव्य दिशेने हे वादळ सरकले आहे.
सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.