नवी दिल्ली, 08 : देशासह राज्यभरात मागच्या आठवड्यापासून कडाक्याच्या उन्हाचा तडाखा बसत आहे. दरम्यान अशातच चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. आसनी चक्रीवादळ पुढच्या 24 तासात धडकण्याची शक्यता आहे. (Asani Cyclone) आज (दि. 08) रविवारी, बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) आग्नेय भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या दाबामुळे आसानी चक्रीवादळ तीव्र झाले आहे. मागच्या 6 तासांत 16 किमी प्रतितास वेगाने पश्चिम-वायव्य दिशेने हे वादळ सरकले आहे.
बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात आज पहाटे 5.30 वाजता निकोबारच्या पश्चिम-वायव्येस सुमारे 450 किमी, पोर्ट ब्लेअरच्या 380 किमी पश्चिमेस, विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) च्या 970 किमी आग्नेय आणि मध्य 1030 किमी दक्षिणेस -पुरी (ओडिशा) च्या आग्नेयला या बाजूने वादळाची (cyclone) दिशा असल्याचे हवामान खात्याकडून (imd report) सांगण्यात आहे.
बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात चक्रीवादळाची तीव्रता वाढल्याने बांगलादेश हवामान विभागाने चितगाव, कॉक्स बाजार, मोंगला आणि पायरा बंदरांना alert दिले आहेत. मच्छिमारांना समुद्रात न जाण्यास सांगण्यात आले आहे.
भारतीय हवामान खात्याचे अधिकारी मृत्युंजय महापात्रा हे म्हणाले कि, चक्रीवादळ ओडिशा किंवा आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या भागात धडकण्याची शक्यता नाही. दरम्यान समुद्राच्या किनारी भागाला समांतर सरकत पुढे जाण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात हे चक्रीवादळाची तिव्रता कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली. विभागाच्या माहितीनुसार, चक्रीवादळाच्या प्रभावामुळे उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर मंगळवारपासून जोरदार वारे आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आयएमडीने आज (दि.08) रविवारी सकाळी 8.30 वाजता जारी केलेल्या बुलेटिनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, वादळ वायव्येकडे सरकत जात पुढील 24 तासांत पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात तीव्र चक्रीवादळ बनण्याची दाट शक्यता आहे. चक्रीवादळ 10 मे च्या संध्याकाळपर्यंत उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागराच्या उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर, ते उत्तर-ईशान्य दिशेला वळण्याची आणि ओडिशा किनाऱ्यापासून वायव्य बंगालच्या उपसागराच्या प्रदेशाकडे जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, ओडिशाच्या किनारपट्टीलगतची समुद्राची स्थिती ९ मे रोजी खडबडीत आणि १० मे रोजी अत्यंत खडबडीत होईल. 10 मे रोजी समुद्रातील वाऱ्याचा वेग ताशी 80 ते 90 किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.