जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'आम्ही शिवसैनिक, आमची गुडघ्यामध्ये अक्कल, काहीही करु', नवनीत राणांविरोधात बोलताना चंद्रकांत खैरेंची जीभ घसरली

'आम्ही शिवसैनिक, आमची गुडघ्यामध्ये अक्कल, काहीही करु', नवनीत राणांविरोधात बोलताना चंद्रकांत खैरेंची जीभ घसरली

'आम्ही शिवसैनिक, आमची गुडघ्यामध्ये अक्कल, काहीही करु', नवनीत राणांविरोधात बोलताना चंद्रकांत खैरेंची जीभ घसरली

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर खरमरीत टीका केली. यावेळी त्यांची जीभ घसरली.

  • -MIN READ
  • Last Updated :

बीड, 8 मे : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana), त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि शिवसेना (Shiv Sena) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून टोकाचा संघर्ष बघायला मिळतोय. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ‘मातोश्री’ या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) बोलण्याचा अट्टहास करुन राणा दाम्पत्य मुंबईत आलं होतं. पण त्यांच्या या अनोख्या आंदोलनाला शिवसैनिकांनी विरोध करत त्यांच्या मुंबईतील निवसस्थानाबाहेर शड्डू ठोकला. त्यामुळे मोठा संघर्ष बघायला मिळाला. या सगळ्या संघर्षानंतर राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना जामीन न मिळाल्याने सलग 13 दिवस जेलमध्ये राहावं लागलं. या दरम्यान नवनीत राणा यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. त्यांच्या टीकेवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांना प्रश्न विचारला असता त्यांची जीभ घसरली. त्यांनी नवनीत राणा यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत सडकून टीका केली. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर खरमरीत टीका केली. यावेळी त्यांची जीभ घसरली. त्यांनी नवनीत राणा यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला. “नवनीत राणांबद्दल मी काहीही बोलणार नाही. मला त्या बाईचा राग आलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ती बाई काहीही बोलते आहे. ती बाई कशी होती हे आम्हाला सगळं माहिती आहे. आम्ही शिवसैनिक, आमच्या डोक्यात वेगळी अक्कल असते, गुडघ्यामध्ये आमची अक्कल असते. आम्ही जाऊन काहीही करु शकतो”, असं म्हणत खैरे यांनी राणा यांच्यावर टीका केली. ते बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. चंद्रकांत खैरे नेमकं काय म्हणाले? “नवनीत राणा यांच्याबद्दल मी काही बोलतच नाही. मी काही बोललो तर ते व्हायरल होईल. कारण मला त्या बाईचा इतका राग आलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बाबतीत काही बोलते. तो रवी राणादेखील. आम्ही शिवसैनिक, आमच्या डोक्यात वेगळी अक्कल असते. किंवा गुडघ्यात अक्कल असते. आम्ही जाऊन सरळ काहीतरी करु शकतो. कारण आम्हाला हे सहन होत नाही. आमचे ते दैवत आहेत, प्रमुख आहेत. काहीपण बोलायचं म्हणजे काय, कोण सहन करेल? ती बाय काय होती, कसंकाय माहिती आहे ना सगळं. जातीचं खोटं प्रमाणपत्र आणून निवडणूक लढवली. आता भाजपचा पाठिंबा आहे म्हणून. पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीत आली तर ती तिकडे गेली. पक्ष बदलणारी ती बाई आहे”, असा घणाघात चंद्रकांत खैरे यांनी केला. ( बीडचा नादखुळा, शेतकऱ्याच्या पोराने अमेरिकेत रचला इतिहास, आपलाच मोडला रेकॉर्ड ) उद्धव ठाकरेंनी जनतेतून निवडणूक लढवावी, असं आव्हान नवनीत राणा यांनी केलं आहे. याबाबत खैरेंना प्रश्न विचारला असता ते संतापले. “ती बाई आहे का कोण आहे? मला त्या बाईचं काहीच सांगू नका”, अशी प्रतिक्रिया त्यांनी संतापात दिली. “राजकारणाची प्रचंड प्रमाणात पातळी घसरत आहे. आमचे जुने मित्र आहेत, माजी मुख्यमंत्री ते बुद्धिवादी आहेत. पण फक्त मोठमोठे भाषण करत असतात. आम्ही त्यांना सांगू इच्छितो, शांत राहा ना जरा. उद्धव ठाकरेंना जरा काम करु द्या. उद्धव ठाकरे त्यांच्याकडे लक्षच देत नाहीय. त्यांचं कामाकडे लक्ष आहे. काम एकीकडे सुरुय. आम्ही जनतेची सेवा करतोय. महाराष्ट्र एक नंबरला आणण्याचं ध्येय मुख्यमंत्र्यांचं आहे. ते आम्ही नक्की आणू, असं चंद्रकांत खैरे म्हणाले. तसेच पक्षातील नेत्यांचे दौरे आता सुरु होतील. कोरोनामुळे दौरे बंद होते. कोरोनामुळे सभा बंद होत्या. पण आता सगळीकडे जोरात सभा आहेत”, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात