Home /News /national /

अयोध्येतील दौऱ्यावरुन राजकारण तापलं! सेनेची पोस्टरबाजी तर राज यांचा कार्यकर्त्यांना आदेश.. TOP बातम्या

अयोध्येतील दौऱ्यावरुन राजकारण तापलं! सेनेची पोस्टरबाजी तर राज यांचा कार्यकर्त्यांना आदेश.. TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

    मुंबई, 8 मे : राज्यात आज राष्ट्रपती, आपचे अरविंद केजरीवाल, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे दौरे आहेत. अयोध्ये दौऱ्याबाबत कुणी बोलण्याचा शहाणपणा करू नये, अशा कडक शब्दांत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना (mns workers) आदेश दिले आहे. अयोध्येत शिवसेनेकडून पोस्टरबाजी करत मनसेला डिवचण्यात आले आहे. मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महागाई वरुन भाजपला लक्ष्य केलं. जमशेदपूरच्या टाटा स्टीलमध्ये आगीचा हाहा:कार. देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी काही मिनिटांत वाचा. राज्यात महत्वाचे दौरे राज्यात आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा दौरा आहे. तर आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांचा नागपूर दौरा आहे. शिवसेना नेते आणि पर्यवारण मंत्री आदित्य ठाकरे पालघर दौरा जाणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा सातार दौरा आहे. राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कडक शब्दांत आदेश मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत आता अयोध्येला जाण्याची तयारी सुरू केली आहे. पण, उत्तर प्रदेशमधील भाजपच्या खासदाराने राज ठाकरेंना थेट आव्हान दिल्यामुळे वाद पेटला आहे. त्यामुळेच कुणी याबाबत बोलण्याचा शहाणपणा करू नये, अशा कडक शब्दांत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना (mns workers) आदेश दिले आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. अयोध्येत शिवसेनेची मनसेविरोधात खोचक पोस्टरबाजी युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या दौऱ्याआधी अयोध्येत (Ayodhya) शिवसेनेकडून (Shiv Sena) पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पोस्टरबाजीतून शिवसेनेने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. 'असली येत आहे, नकली पासून सावधान', अशा शब्दांमध्ये शिवसेनेने पोस्टरच्या माध्यमातून राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. थोरातांचा भाजपला सणसणीत टोला 'पेट्रोल-डिझेलचे दर (petrol diesel price hike) वाढल्याने महागाई वाढली असून केंद्र सरकारचं यावर काहीही नियंत्रण नाही का? हेच का अच्छे दिन आहेत का ? असं म्हणत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांनी भाजपवर टीका केली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi Government) सरकारवर ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) निवडणुका घेण्याच्या मुद्यावरुन हल्लाबोल केला आहे. भाजपच्या ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारणीमध्ये ते बोलत होते. सरकारने या राजकीय आरक्षणाची ठरवून कत्तल केली. खून केला. यामागे मोठं षडयंत्र आहे. 2010 साली पहिल्यांना कोर्टाने 50 टक्के आरक्षण देता येणार नाही असं सांगितलं होतं. मात्र, काँग्रेस सरकारने काही केलं नाही, अशा शब्दात फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. जमशेदपूरच्या टाटा स्टीलमध्ये आगीचा हाहा:कार झारखंडच्या (Jharkhand) जमशेदपूरमध्ये असलेल्या टाटा स्टीलच्या कोक प्लांटमध्ये (Jamshedpur Tata Steel plant) मोठी दुर्घटना घडली आहे. संबंधित प्लांटमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर आग (fire) लागली. ही आग पाहतापाहता प्रचंड भीषण बनली. या आगीवर नियंत्रण मिळवणं कंपनीत काम करणाऱ्या कामगारांसाठी खूप आव्हानात्मक बनलं. अखेर अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू करुन कंपनीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढलं. संबंधित घटना ही आज सकाळी 10.20 वाजेच्या सुमारास घडली. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. आप आमदाराच्या मालमत्तेवर सीबीआयची टाच, राजकीय वर्तुळात खळबळ पंजाबमधून (Punjab) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आम आदमी पक्ष (AAP) म्हणजेच 'आप'च्या एका आमदाराविरोधात सीबीआयने (CBI) मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने या आमदाराशी संबंधित अनेक ठिकाणांवर छापा (raid) टाकला आहे. या छापेमारी मागे 40 कोटी बँक फसवणुकीचा आरोप असल्याची माहिती आता समोर येत आहे. सीबीआयच्या छापेमारीबाबत माहिती समोर आल्यानंतर राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Ayodhya, Raj thacarey, Shivsena

    पुढील बातम्या