रांची, 7 मे : झारखंडच्या (Jharkhand) जमशेदपूरमध्ये असलेल्या टाटा स्टीलच्या कोक प्लांटमध्ये (Jamshedpur Tata Steel plant) मोठी दुर्घटना घडली आहे. संबंधित प्लांटमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर आग (fire) लागली. ही आग पाहतापाहता प्रचंड भीषण बनली. या आगीवर नियंत्रण मिळवणं कंपनीत काम करणाऱ्या कामगारांसाठी खूप आव्हानात्मक बनलं. अखेर अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू करुन कंपनीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढलं. संबंधित घटना ही आज सकाळी 10.20 वाजेच्या सुमारास घडली. गॅस कटिंग आणि वेल्डिंगच्या कामाच्या दरम्यान गॅल लीक झाल्याने ही दुर्घटना घडली, अशी माहिती समोर आली आहे. संबंधित घटनेनंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (CM Hemant Soren) यांनी ट्विट करत जिल्हा प्रशासनाकडून सर्व गोष्टींची काळजी घेतली जात असल्याची माहिती दिली. जमशेदपूरमध्ये टाटा स्टील प्लांटमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी टाटा स्टील कंपनीच्या प्रशानासोबत मिळून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात आहेत, असं मुख्यमंत्री हेमंत सोरेन आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत. दरम्यान, स्फोटाचा आवाज इतका भयानक होता की, त्याचा आवाज लांबपर्यंत ऐकू गेला. विस्फोटाचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली. या दुर्घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तर दोन इतर व्यक्तींनाही जखम झाली आहे. ( ‘पोलिसांनी माझं फोन रेकॉर्डिंग ऐकवलं, तो आवाज माझाच होता’, फोन टॅपिंग प्रकरणी नाना पटोलेंचा मोठा दावा ) कोक प्लांट बॅटरी नंबर पाच, सहा आणि सात यांच्या दरम्यान हा स्फोट झाला आहे. टाटा स्टीलने दिलेल्या माहितीनुसार, बॅटरी नंबर 6 ची गॅस लाईनमध्ये हा स्फोट झाला. त्यामुळे आता बॅटरी नंबर 6 ला बंद करण्यात आलं आहे. त्या बॅटरीला वेगळं करण्याचं काम सुरु आहे. तसेच घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने रुग्णवाहिका आणि इतर यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यामुळे आता परिस्थिती नियंत्रणात आहे, असंही कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
#WATCH Jharkhand | A fire broke out in a Coke plant of Tata Steel Factory in Jamshedpur due to an alleged blast in a battery. Five fire tenders at the spot, 2 labourers reportedly injured. pic.twitter.com/Y7cBhVSe1A
— ANI (@ANI) May 7, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, बॅटरी नंबर पाच, सहा आणि सातच्या गॅस लाईनमध्ये जेव्हा गॅस कटिंग आणि वेल्डिंगचं काम सुरु होतं त्यावेळी अचानक गॅल लीक व्हायला लागला. गॅस लाईनमध्ये कार्बन मोनोक्साईड होतं, जे फार ज्वलनशील असतं. त्यामुळे गॅस लीक झाल्यानंतर स्फोट झाला. त्यातून आग लागली. ही आग पाहतापहता प्रचंड भडकली.