शिर्डी, 07 मे : ‘पेट्रोल-डिझेलचे दर (petrol diesel price hike) वाढल्याने महागाई वाढली असून केंद्र सरकारचं यावर काहीही नियंत्रण नाही का? हेच का अच्छे दिन आहेत का ? असं म्हणत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांनी भाजपवर टीका केली आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरची दरवाढ झाल्याने सामान्य माणसाच्या कुटुंबावर परिणाम झाला आहे. आंदोलन करणारे भाजपाचे नेते आता कुठं लपून बसले आहे? असा सवाल उपस्थित करत जनता यांना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही, असं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. ( विश्वविजेत्या गोलंदाजाने वेगवान गोलंदाज उमरान मलिकचे टोचले कान, म्हणाला.. ) विजबील सर्वांनीच भरणं गरजेचं आहे तरच ही व्यवस्था चालू शकेल. मंत्री नेते राज्यकर्ते यांनी वेळेवर विज बील भरून आदर्श निर्माण केला पाहिजे असं म्हणत माझ्याकडे कोणतंही बील थकीत नाही मात्र चालू बिलामुळे माझं नाव आलं असेल, असं थकीत विजबिलाच्या प्रश्नावर बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टीकरण दिलं. ( पती-पत्नीचा रात्रीच्या अंधारात काळा धंदा, अखेर मुंबई पोलिसांनी नांग्या ठेचल्या ) ‘राजद्रोहाच्या संदर्भात सरकारचंही म्हणणं असेल ते न्यायालयात ते मांडलं जाईल जर या न्यायालयाने काही वेगळा निर्णय दिला तर पुढच्या कोर्टात सरकार जाईल, असं म्हणत मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर जावून हनुमान चालीसा वाचणं हा महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न हा राष्ट्रविरोधी असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हणत रवी राणा आणि खासदार नवनीत राणांवर टीका केली. ‘कोण काय कारणं शोधतंय यापेक्षा ओबीसींना न्याय मिळणं गरजेचं आहे आरक्षण मिळावं न्याय मिळावा यासाठी महाविकास आघाडीचा कायम प्रयत्न राहिला असून न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असं म्हणत ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर फडणवीसांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना थोरातांनी प्रतिक्रिया दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.