जाहिरात
मराठी बातम्या / देश / भोंग्यावरुन सह्याद्रीवर सर्वपक्षीय बैठक, भाजप शिष्टमंडळ केंद्रीय गृहसचिवांना भेटणार.. देशविदेशातील TOP बातम्या

भोंग्यावरुन सह्याद्रीवर सर्वपक्षीय बैठक, भाजप शिष्टमंडळ केंद्रीय गृहसचिवांना भेटणार.. देशविदेशातील TOP बातम्या

भोंग्यावरुन सह्याद्रीवर सर्वपक्षीय बैठक, भाजप शिष्टमंडळ केंद्रीय गृहसचिवांना भेटणार.. देशविदेशातील TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 एप्रिल : लाऊडस्पीकरवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आघाडी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी तर राज्याच्या परिस्थितीबाबत भाजप शिष्टमंडळ भारत सरकारच्या गृह सचिवांना भेटणार आहे. पंतप्रधान मोदींना लता मंगेशकर पुरस्कार प्रदान. कर्नाटकात आता नवीन वाद. यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी वाचा अवघ्या काही मिनिटांत. भोंग्यावरुन सह्याद्रीवर सर्वपक्षीय बैठक महाराष्ट्रात लाऊडस्पीकरवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेससोबतच भाजप आणि मनसेलाही निमंत्रित करण्यात आले आहे. राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याच्या घोषणेप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर मुंबईतील एका न्यायालयाने रविवारी अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मंगेशकर कुटुंबीयांची कृती 12 कोटी माणसांचा अपमान करणारी : आव्हाड मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार (Lata Deenanath Mangeshkar award) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना प्रदान करण्यात आला. पण, या पुरस्कार सोहळ्यावरून नाराजीनाट्य सुरूच आहे. ‘मंगेशकर कुटुंबीयांची ही कृती 12 कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे’ अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad) यांनी टीका केली.

माजी राज्यपाल शंकरनारायणन यांचं निधन

महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल कटीकल शंकरनारायणन यांचं निधन झालं आहे. ते 90 वर्षांचे होते. केरळ येथील पालघाट येथे शंकरनारायणन यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. (former governor k Sankaranarayanan passes away) पंतप्रधान मोदींना लता मंगेशकर पुरस्कार प्रदान मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार (Lata Deenanath Mangeshkar award) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना देण्यात आला आहे. मात्र, या कार्यक्रमाला ह्रदयनाथ मंगेशकर गैरहजर होते. या कार्यक्रमाला मंगेशकर कुटुंबीयांच्या इतर सदस्य हजर आहे. ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. स्थानिक संस्था निवडणुकीत आरक्षण लागू होणार की नाही? याचा निकाल येण्याची शक्यता आहे. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात भाजप मुंबई शिष्टमंडळ सकाळी 10.15 वाजता नॉर्थ ब्लॉक नवी दिल्ली येथे भारत सरकारच्या गृह सचिवांना भेटणार आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांची कोठडी आज संपणार आहे. त्यांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी दुपारी ३ वाजता होणार आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या ही चौथी लाट तर नाही? कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेनंतर (corona thir wave) परिस्थिती पूर्वपदावर येत असताना पुन्हा एकदा वाढत्या रुग्णांमुळे हा चौथ्या लाटेचा संकेत तर नाही ना? अशी भीती लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. सामान्य लोकांच्या या चिंतेवर, पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया (PHFI) चे अध्यक्ष के. श्रीनाथ रेड्डी यांना विचारले असता ते म्हणतात की सध्या ज्या प्रकारे कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत, ती चौथी लाट मानता येणार नाही. कर्नाटकात नवीन वाद कर्नाटकातील बेंगळुरू (bengluru) येथील एका शाळेने विद्यार्थ्यांना शाळेत बायबल (bible) घेऊन जाणे बंधनकारक केले आहे. यावर उजव्या विचारसरणीच्या गटांनी नाराजी व्यक्त केली आहे. क्लेरेंस स्कूल (clarence school bangalore) असे या शाळेचे नाव आहे. जहांगीरपुरी हिंसाचार जहांगीरपुरीच्या छोट्या गल्लीपासून पश्चिम बंगालच्या सागर बेटापर्यंत, जहांगीरपुरी हिंसाचाराचा तपास करताना दिल्ली पोलिसांनी बराच पल्ला गाठला आहे. गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत असताना, किमान 11 आरोपींचे पश्चिम बंगालशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. पद्म आणि राजकारण काँग्रेस आणि गांधी हे “खंडणीखोर” आहेत आणि ते पद्मभूषण विकत होते, असा आरोप भाजपने केला आहे. येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांनी अंमलबजावणी संचालनालयासमोर मोठा दावा केला आहे. त्यांनी ईडीला सांगितले की, मला प्रियांका गांधी वड्रा यांच्याकडून एमएफ हुसैन यांचे पेंटिंग विकत घेण्यास भाग पाडण्यात आले. ते म्हणाले की, दिलेली रक्कम गांधी परिवाराने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपचारासाठी वापरली होती. फेडरल अँटी मनी लाँडरिंग एजन्सीने दाखल केलेल्या आरोपपत्रात ही बाब समोर आली आहे.

रशियासाठी मारियुपोलवरील विजय का आहे महत्त्वाचा?

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला (Russia-Ukraine War) आता दोन महिने होत आले आहेत. पुतीन यांना या लढाईचं लवकरात लवकर विजयात रूपांतर करायचं आहे. रशियाने मारियुपोल ताब्यात घेणं म्हणजे युक्रेनच्या युद्धातील विजयासारखं आहे, असं विश्लेषकांचं म्हणणं आहे. तज्ज्ञांच्या मते, अझोव्ह समुद्राच्या किनार्‍यावरील युक्रेनचं मारियुपोल हे बंदराचं शहर ताब्यात घेतल्यानं रशियाला त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या क्रिमियापासून डोनेस्तक प्रजासत्ताकपर्यंतचा भूमार्ग उपलब्ध होईल. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी युक्रेनवर हल्ला करण्यापूर्वी डोनेस्तक आणि लुहान्स्क प्रजासत्ताकांना स्वतंत्र प्रदेश म्हणून मान्यता दिली. अशा स्थितीत मारियुपोल ताब्यात घेणं ही रशियाच्या दृष्टीने मोठी बाब आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात