Home /News /mumbai /

Raj Thackeray : भोंग्यांचा मुद्दा, राज ठाकरे सर्वपक्षीय बैठकीत हजर राहणार नाहीत

Raj Thackeray : भोंग्यांचा मुद्दा, राज ठाकरे सर्वपक्षीय बैठकीत हजर राहणार नाहीत

राज्य सरकारने भोंग्याबद्दल चर्चा करण्यासाठी उद्या सकाळी अकरा वाजता मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. पण या बैठकीत मनसे अधयक्ष राज ठाकरे जाणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई, 24 एप्रिल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) सर्वपक्षीय बैठकीत (all party meet) हजर राहणार नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने (Maharashtra Government) भोंग्याबद्दल चर्चा करण्यासाठी उद्या सकाळी अकरा वाजता मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. पण या बैठकीत मनसे अधयक्ष राज ठाकरे जाणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राज ठाकरे यांच्याऐवजी मनसेकडून बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) पक्षाचं प्रतिनिधित्व करणार आहेत. भोंग्याबद्दल चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाही सरकारने निमंत्रण दिलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे (Mosque speaker) उतरविण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यांच्या या अल्टिमेटमनंतर काही मुस्लिम संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज ठाकरे यांना मशिदींवरील भोंग्याबाबतची भूमिका जाहीर केल्यापासून अनेक धमकीचे फोन आले आहेत. पण तरीही ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. राज ठाकरेंच्या भोंग्याबाबतच्या भूमिकेवरुन राज्यात काही गैरप्रकार घडू नये म्हणून राज्य सरकार (Maharashtra Government) आणि पोलीस (Police) यंत्रणांकडून काळजी घेतली जात आहे. विशेष म्हणजे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी गोपनीय अहवालाचा उल्लेख करत राज्यात 3 मे नंतर काहीतरी विस्फोटक परिस्थिती उद्भवू शकते, असा दावा केला होता. तसेच या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात येईल, अशी माहिती दिली होती. या बैठकीचं राज ठाकरे यांनाही निमंत्रण दिलं जाईल, असंही दिलीप वळसे पाटील म्हणाले होते. (राणा दाम्पत्याला भिडणाऱ्या 'फायरब्रँड' आजीच्या घरी पोहोचले ठाकरे कुटुंब, म्हणाले, 'झुकेंगा नहीं') गृहमंत्री नेमकं काय म्हणाले होते? "सुप्रीम कोर्टाचं 2005 सालाचं जजमेंट आहे. त्यानंतर 2015, त्यानंतर 2017 साली राज्य सरकारने जीआर काढलेले आहेत. त्यामघ्ये लाऊड स्पिकरची पद्धत ठरवून दिलेली आहे. त्याबाबतची अंमलबजवणी करण्याची सूचना संबंधितांना देण्यात येतील. या संदर्भातला अंतिम निर्णय घेण्याआधी मी राज्यातील सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलवून त्यांच्याशी याबाबत चर्चा करणार आहे. काही संघटनांची देखील बैठक बोलावून चर्चा करणार आहे. आणि मग याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल", असं दिलीप वळसे पाटील म्हणाले होते.
Published by:Chetan Patil
First published:

Tags: MNS, Raj Thackeray

पुढील बातम्या