Home /News /mumbai /

'मंगेशकर कुटुंबीयांची कृती 12 कोटी माणसांचा अपमान करणारी', जितेंद्र आव्हाडांची थेट टीका

'मंगेशकर कुटुंबीयांची कृती 12 कोटी माणसांचा अपमान करणारी', जितेंद्र आव्हाडांची थेट टीका

'लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचे नाव टाकण्याच मंगेशकर कुटुंबीयांनी टाळले. त्यांची ही भूमिका अगम्य आहे'

'लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचे नाव टाकण्याच मंगेशकर कुटुंबीयांनी टाळले. त्यांची ही भूमिका अगम्य आहे'

'लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचे नाव टाकण्याच मंगेशकर कुटुंबीयांनी टाळले. त्यांची ही भूमिका अगम्य आहे'

    मुंबई, 24 एप्रिल : मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार (Lata Deenanath Mangeshkar award) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना प्रदान करण्यात आला. पण, या पुरस्कार सोहळ्यावरून नाराजीनाट्य सुरूच आहे. 'मंगेशकर कुटुंबीयांची ही कृती 12 कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे' अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad) यांनी टीका केली. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबईतील ष्णमुखानंद हॉलमध्ये प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गैरहजर होते. पण, या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर सुद्धा मुख्यमंत्र्यांचा उल्लेख टाळण्यात आला होता. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त करत टीव्ट केले. 'मंगेशकर कुटुंबीयांची कृती 12 कोटी माणसांचा अपमान करणारी', जितेंद्र आव्हाडांची थेट टीका असं म्हणत आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली. तसंच, 'या राज्यात राहून अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांची ही कृती 12 कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे' अशी टीकाही आव्हाड यांनी केली. (शिवसेनेशी भिडणे पडले भारी, नवनीत राणा भायखळा तर रवी राणा तळोजा जेलमध्ये मुक्कामी) दरम्यान, या कार्यक्रमाला  राज्य सरकारच्या वतीने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हजेरी लावली होते. राजशिष्टाचार म्हणून आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई हे मुंबई विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी गेले होते. या कार्यक्रमाला विशेष करून, भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सुद्धा उपस्थितीत होते. पंतप्रधान मोदींनी पुरस्कार केला देशातील नागरिकांना समर्पित दरम्यान,  पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आपण हा पुरस्कार देशाच्या जनतेला समर्पित करत असल्याचं ते म्हणाले. यावेळी मोदींनी लता दीदींच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी लतादीदी यांच्यासोबत आपली ओळख कधी झाली याबात माहिती दिली. तसेच त्यानंतर आपले मंगेशकर कुटुंबासोबत घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाले, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. (IPL : आजच्याच दिवशी सुरू झाला रोहितचा तो प्रवास, 9 वर्षांनी पुन्हा गंभीरच समोर!) "चार-साडे चार दशकांपूर्वी ज्येष्ठ दिवंगत संगीतकार आणि गायक सुधीर फडकेंनी आमचा परिचय केला होता. तेव्हापासून आजपर्यंत मंगेशकर परिवारासोबत अपार स्नेह, अगणित घटना माझ्या आयुष्याचा भाग बनले. माझ्यासाठी लतादीदी सूरसम्राज्ञीसह मोठी बहीण होती. मला त्यांच्याकडून नेहमी मोठ्या बहीणीसारखं अपार प्रेम मिळालं आहे. यापेक्षा माझ्या आयुष्यातलं मोठं सौभाग्य काय असू शकतं! आता राखी पौर्णिमेला दीदी राहणार नाहीत. लता दीदींच्या नावाने पुरस्कार मिळणं हे सौभाग्य आहे. हा पुरस्कार स्वीकारणं माझं दायित्व आहे. मी या पुरस्काराला संपूर्ण देशवासींना समर्पित करतो", अशा भावना नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्या.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या