Home /News /videsh /

रशियासाठी मारियुपोलवरील विजय का आहे महत्त्वाचा? पुतिननी याला का म्हटलंय 'मुक्ती'?

रशियासाठी मारियुपोलवरील विजय का आहे महत्त्वाचा? पुतिननी याला का म्हटलंय 'मुक्ती'?

Russia-Ukraine War: 24 फेब्रुवारीला, रशियाने युक्रेनच्या उत्तरेकडील प्रदेशातील बेलारूस सीमेपासून कीव आणि खार्किव, पूर्वेकडील बंडखोर-नियंत्रित डोनबास आणि दक्षिणेकडील क्रिमियापर्यंत तीन-आघाडीवर हल्ला केला. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज 60 वा दिवस असून पुतिन यांच्या लष्कराने आता युक्रेनचा पूर्वेकडील भाग ताब्यात घेण्यासाठी पूर्ण जोर लावला आहे.

पुढे वाचा ...
  मॉस्को, 24 एप्रिल : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला (Russia-Ukraine War) आता दोन महिने होत आले आहेत. पुतीन यांना या लढाईचं लवकरात लवकर विजयात रूपांतर करायचं आहे. रशियाने मारियुपोल ताब्यात घेणं म्हणजे युक्रेनच्या युद्धातील विजयासारखं आहे, असं विश्लेषकांचं म्हणणं आहे. तज्ज्ञांच्या मते, अझोव्ह समुद्राच्या किनार्‍यावरील युक्रेनचं मारियुपोल हे बंदराचं शहर ताब्यात घेतल्यानं रशियाला त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या क्रिमियापासून डोनेस्तक प्रजासत्ताकपर्यंतचा भूमार्ग उपलब्ध होईल. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी युक्रेनवर हल्ला करण्यापूर्वी डोनेस्तक आणि लुहान्स्क प्रजासत्ताकांना स्वतंत्र प्रदेश म्हणून मान्यता दिली. अशा स्थितीत मारियुपोल ताब्यात घेणं ही रशियाच्या दृष्टीने मोठी बाब आहे. मारियुपोलवरील विजय रशियासाठी का महत्त्वाचा आहे हे समजून घेऊया… युद्धाच्या सुरुवातीपासून रशियाचे संपूर्ण लक्ष मारियुपोल काबीज करण्यावर होतं. १८व्या शतकातील रशियन राजा मारिया फेडोरोव्हना याच्या नावावर असलेलं, मारियुपोल शहर रशियामधील शाही राजवटीच्या काळात अझोव्ह गव्हर्नरच्या नियंत्रणाखाली होतं. दुसऱ्या महायुद्धादरम्यान, हिटलरच्या नेतृत्वाखालील जर्मन सैन्याने मारियुपोलला ताब्यात घेतलं. हे युद्ध सुमारे दोन वर्षं चाललं. यादरम्यान, नाझी सैन्यानं स्थानिक लोकांच्या मदतीनं ज्यूंचा नायनाट करण्याची मोहीम सुरू केली. यानंतर मारियुपोल शहर रशियन रेड आर्मीने मुक्त केलं आणि सोव्हिएत डावे नेते आंद्रेई झदानोव यांच्या नावावरून त्यांचं नाव झदानोव ठेवले. 1989 मध्ये, सोव्हिएत युनियनच्या पतनाच्या दोन वर्षांपूर्वी, त्याचं पुन्हा एकदा मारियुपोल असं नामकरण करण्यात आलं. ब्रिटीश लष्कराचे माजी कमांडर जनरल सर रिचर्ड बॅरॉन यांनी बीबीसीला सांगितलं की, मारियुपोल ताब्यात घेणं हे रशियासाठी खूप महत्त्वाचं आहे. युद्धाच्या शेवटी रशियन लोकांना मारियुपोलकडे जाण्याचा भूमार्ग मिळणं याकडे एक मोठं रणनीतिक यश म्हणून पाहण्यात येईल. हे वाचा - रशिया आणि चीनच्या युद्धनौका जपानच्या अगदी जवळ, संरक्षण मंत्रालयाने दिला दुजोरा
  रशियाने काळ्या समुद्राच्या 80 टक्के भागावरही कब्जा केलाय
  मारियुपोल ताब्यात येण्यामुळे रशियाने आता युक्रेनच्या काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावरील 80 टक्के भूभाग ताब्यात घेतला आहे. यामुळे युक्रेन केवळ सागरी व्यापारापासून दूर होणार नाही तर, जगापासूनही तो वेगळा होईल. रशियाने मारियुपोलवर बंदुका, रॉकेट आणि क्षेपणास्त्रांनी एवढा विध्वंस केला आहे की, जवळपास 90 टक्के शहर उद्ध्वस्त झालं आहे.
  म्हणूनच पुतिन यांनी याला म्हटलंय 'मुक्ती' मारियुपोल कोस्ट हे खोल समुद्रातील बंदर आहे. इथून युक्रेन आखाती देशांमध्ये स्टील, कोळसा आणि मका निर्यात करत असे. मारियुपोल ताब्यात घेतल्यानंतर, पुतिन आता आपल्या लोकांना विजय म्हणून दाखवू शकतील. कारण, रशियन जनतेचा एक भाग देखील युक्रेन युद्धाला विरोध करत आहे. त्यामुळे पुतिन यांनी त्याला 'मुक्ती' असे नाव दिलं आहे. मारियुपोलमध्ये 20 हजार लोक मरण पावले युक्रेनियन अधिकार्‍यांनी दावा केला आहे की, रशियन सैन्याने मारियुपोलच्या बॉम्बफेकीत 20,000 लोक रस्त्यावर मरण पावले आहेत. यामध्ये महिला, लहान मुले, वृद्धांचा समावेश आहे. हे मृतदेह आता दिसेनासे झाले आहेत. युक्रेनचा अंदाज आहे की 1,00,000 लोक अजूनही मारियुपोलमध्ये राहतात. हे वाचा - रशिया मारियुपोल काबीज करण्याच्या जवळ! युक्रेनियन सैन्याच्या शेवटच्या गडावर पुन्हा हवाई हल्ले
  मानहुशमध्ये सामूहिक कबर सापडली
  मारियुपोलचे महापौर वद्यम बॉयचेन्को यांनी आरोप केला की, रशियन सैन्य आपल्या सैन्याचे मानहूशमधील गुन्हे लपवत आहे. महापौरांचे सल्लागार पेट्रो म्हणाले की, बराच शोध घेतल्यानंतर असं आढळून आलंय की, रशियन सैन्याने मानहुशमध्ये मारियुपोलमध्ये ठार झालेल्यांचे मृतदेह पुरले आहेत.
  पेट्रो म्हणाले की, रशियन सैन्याने मानहूशमध्ये अनेक सामूहिक कबरी खोदल्या आहेत, ज्या सुमारे 100 फूट लांब आहेत. हे शहर मारियुपोलच्या पश्चिमेस 19 किमी अंतरावर एक शहर आहे. ते म्हणाले की ट्रकने मृतदेह वाहून नेले आणि ते थेट कबरीत टाकले. "हा युद्ध गुन्ह्यांचा स्पष्ट पुरावा आहे आणि ते लपविण्याचा प्रयत्न करत आहेत," असं पेट्रो म्हणाले. रशियन सैनिकांनी मारियुपोल येथून मृतदेह ताब्यात घेतले. या कबरींचा विस्तार 23 ते 26 मार्च दरम्यान झाल्याचं आमच्या पुनरावलोकनातून समोर आलं आहे. त्यानंतरही त्यांच्या विस्ताराची प्रक्रिया सुरूच राहिली. मारियुपोलनंतर आता रशियाची नजर युक्रेनची राजधानी कीव, ल्विव्ह, बुचा या शहरांवर आहे. रशियन सैन्य तिकडे सरकलं आहे.
  Published by:Digital Desk
  First published:

  Tags: Russia Ukraine, Russia's Putin, Ukraine news

  पुढील बातम्या