बंगळुरू, 24 एप्रिल : कर्नाटकातील बेंगळुरू (bengluru) येथील एका शाळेने विद्यार्थ्यांना शाळेत बायबल (bible) घेऊन जाणे बंधनकारक केले आहे. यावर उजव्या विचारसरणीच्या गटांनी नाराजी व्यक्त केली आहे. क्लेरेंस स्कूल (clarence school bangalore) असे या शाळेचे नाव आहे.
बायबल बंधनकारक नेमका काय प्रकार?
क्लेरेन्स स्कूलने पालकांकडून प्रतिज्ञापत्रही घेतले असून, विद्यार्थ्यांना बायबल किंवा हिमचे पुस्तक (स्तोत्र) शाळेत नेण्यास हरकत नाही, असे त्यात नमूद केले गेले आहे. यावर हे कर्नाटक कायद्याचे उल्लंघन आहे, अशी प्रतिक्रिया नवीन निर्देशावर उजव्या विचारसरणीच्या गटांकडून आल्या आहेत. विद्यार्थ्यांवर त्यांच्या इच्छेविरुद्ध धार्मिक शिक्षण लादले जात असल्याचा आरोप गटाने केला आहे. शाळेवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.
भगवदगीतेची घोषणा -
अलीकडेच, कर्नाटक सरकारने शाळांमध्ये शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीता समाविष्ट करण्याची योजना जाहीर केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले होते की, शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्याचा निर्णय चर्चेनंतर घेतला जाईल.
कर्नाटकचे शिक्षणमंत्री काय म्हणाले?
भगवद्गीता या देशातील लोक अनेक वर्षांपासून वाचत आहेत. गीता सर्व लोक वाचतात आणि जगभरातील सर्व भाषांमध्ये गीतेचे भाषांतर केले जात आहे. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आम्ही आधी शिक्षणतज्ज्ञ आणि तज्ज्ञांशी चर्चा करू, असे कर्नाटकचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री बीसी नागेश म्हणाले आहेत. कर्नाटक व्यतिरिक्त, गुजरातने देखील शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून, भगवद्गीता इयत्ता 6 ते 12 च्या शालेय अभ्यासक्रमाचा भाग असेल, असे जाहीर केले आहे.
कर्नाटकातील शाळांमध्ये मुस्लिम विद्यार्थिनींनी हिजाब (Karnataka Colleges protest against Hijab) घालण्यावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. हिजाबच्या निषेधार्थ बजरंग दलाच्या संघटनांनी विद्यार्थ्यांना भगवे स्कार्फ घालायला लावल्याच्या बातम्याही आल्या आहेत. सोशल मीडियावरही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. काही धार्मिक स्वातंत्र्याचा हवाला देत आहेत, तर काही संस्थांपासून धार्मिक ओळख वेगळे करण्यास अनुकूल आहेत. हिजाबच्या चर्चेला पुन्हा उधाण आल्यानंतर आता शाळेत बायबल बंधनकारक केल्यामुळे आणखी एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.