मुंबई, 11 मे : राज्यातील महापालिका निवडणुका या दोन टप्प्यात होण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना खरमरीत पत्र पाठवलं आहे. भारतात कोरोनाची चौथी लाट येणार का? या प्रश्नाचं उत्तर तज्ज्ञांनी दिलं आहे. शेजारी राष्ट्र श्रीलंकेत परिस्थिती आणखी बिघडली असून दंगेखोरांना गोळ्या घालण्याचे आदेश सैन्याला देण्यात आले आहेत. देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी काही मिनिटांत वाचा. महापालिका निवडणुकांबाबत सर्वात मोठी बातमी राज्यातील जवळपास 14 महापालिका 25 जिल्हा परिषदांसह अनेक नगरपंचायती आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुका प्रलंबित आहेत. त्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आता लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच महापालिका निवडणुका या दोन टप्प्यात होण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. राज ठाकरे यांच्या सहीचं मुख्यमंत्र्यांना पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी मनसैनिकांविरोधात सुरु असलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईवरुन मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. “राज्य सरकारला (Maharashtra Government) माझं एकच सांगणं आहे, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही”, अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना सुनावलं आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. राज ठाकरे इतकी भाबडी अपेक्षा ठेवतील असं वाटलं नव्हतं : देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र लिहिलं आहे. या पत्राबाबत भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना प्रश्न विचारला असता त्यांनी राज ठाकरे यांना सरकार विरोधी लढलं पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं. तसेच भोंग्यांच्या मुद्द्यावरुन सरकारकडे अपेक्षा ठेवू नये, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यातला ‘अडथळा’ फडणवीस करतील दूर? मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery Ayodhya visit ) जून महिन्यात अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहे. पण, उत्तरप्रदेशमधील भाजपचे खासदार ब्रीज भूषण सिंह (BJP MP Brij Bhushan Singh) यांनी विरोध केला आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या दौऱ्यावरून वाद निर्माण झाला आहे. ‘रामाच्या शरणात जो जात असेल त्याला जाऊ दिलं पाहिजे, रामाच्या शरणात जाण्यापासून कुणाला रोखण्याचे काही कारण नाही, असं म्हणत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी ब्रीजभूषण सिंह यांची समजूत काढण्याचे संकेत दिले आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. तुळजाभवानी मंदिरात संभाजीराजेंचा अवमान, गाभाऱ्यात जाण्यापासून रोखले भाजपचे खासदार संभाजीराजे (sambhajraje ) उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता कुलस्वामामिनी तुळजाभवानी मंदिरात (tulja bhavani mantra osmanabad) गेले असता गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारमुळे तुळजापुरात खळबळ उडाली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. भारतात येणार कोरोनाची चौथी लाट? कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर बहुतांश सर्व व्यवहार आता सुरळीत झाले आहेत. मास्कबंदीही काही राज्यांमध्ये हटवली गेली आहे. त्यामुळे आता कोरोना (corona pandemic) संपल्यात जमा असल्याचं अनेकांना वाटत असतानाच चौथी लाट येईल की काय अशी भीतीही जनमानसात आहे; मात्र भारतात चौथी लाट येण्याची फारशी शक्यता नाही, असं मत आयआयटी कानपूरमधील प्राध्यापक मणींद्र अग्रवाल यांनी मांडलं आहे. अग्रवाल यांनी कोरोनाबाबत गेल्या दोन वर्षांमध्ये वर्तवलेले अनेक अभ्यासपूर्ण अंदाज योग्य ठरले होते. आताही नव्या अभ्यासानुसार त्यांनी हा दावा केला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. ताजमहल पुन्हा वादात जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक असलेला ताजमहाल ही आपल्या देशाची एक ओळख आहे. मुघल सम्राट शाहजहानने आपली पत्नी मुमताजच्या आठवणीखातर हा ताजमहाल (Taj Mahal) बांधला असल्याचं आपण सर्वांनी वाचलं आहे. आता याच ताजमहालामुळे नवा वाद सुरू झाला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. आर्थिक संकटात श्रीलंकेत परिस्थिती बिघडली श्रीलंकेतील अभूतपूर्व आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या कर्मचाऱ्यांना सार्वजनिक मालमत्तेची लूट करणाऱ्या किंवा सर्वसामान्यांना दुखापत करणाऱ्या कोणत्याही दंगलखोराला गोळ्या घालण्याचे आदेश दिले. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी लोकांना “हिंसा आणि सूडाची कृत्ये” थांबवण्याचे आवाहन केल्यानंतर मंत्रालयाचा आदेश आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.