जाहिरात
मराठी बातम्या / देश / Taj Mahal मध्ये मुमताजची कबर का मंदीर? त्या खोल्यांचं कुलूप उघडल्यावरच उलगडणार रहस्य!

Taj Mahal मध्ये मुमताजची कबर का मंदीर? त्या खोल्यांचं कुलूप उघडल्यावरच उलगडणार रहस्य!

Taj Mahal मध्ये मुमताजची कबर का मंदीर? त्या खोल्यांचं कुलूप उघडल्यावरच उलगडणार रहस्य!

मुघल सम्राट शाहजहानने आपली पत्नी मुमताजच्या आठवणीखातर ताजमहाल (Taj Mahal) बांधला असल्याचं आपण सर्वांनी वाचलं आहे. आता याच ताजमहालामुळे नवा वाद सुरू झाला आहे. ताजमहाल म्हणजे मुमताजची कबर नसून, तिथे आधी मंदिर (Taj Mahal controversy) होतं असा दावा अनेक जण करत आहेत.

    आग्रा, 10 मे : जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक असलेला ताजमहाल ही आपल्या देशाची एक ओळख आहे. मुघल सम्राट शाहजहानने आपली पत्नी मुमताजच्या आठवणीखातर हा ताजमहाल (Taj Mahal) बांधला असल्याचं आपण सर्वांनी वाचलं आहे. आता याच ताजमहालामुळे नवा वाद सुरू झाला आहे. ताजमहाल म्हणजे मुमताजची कबर नसून, तिथे आधी मंदिर (Taj Mahal controversy) होतं असा दावा अनेक जण करत आहेत. ताजमहालचं खरं नाव ‘तेजोमहाल’ होतं असंही कित्येक जण म्हणत आहेत. यातच ताजमहालाच्या खाली असलेल्या 22 बंद खोल्या उघडण्याबाबत (22 Rooms under Taj Mahal) अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. काय म्हटलंय याचिकेत? “ताजमहालाच्या खाली 22 खोल्या आहेत. त्या कित्येक वर्षांपासून बंद आहेत. या खोल्या उघडल्यास ताजमहाल मंदिर होतं की कबर हे स्पष्ट होईल. त्यामुळे या खोल्या उघडण्यात याव्यात,” असं या याचिकेत म्हटलं आहे. इतिहासकार राज किशोर (Historian Raj Kishor) यांनी या याचिकेचं समर्थन केलं आहे. “या 22 खोल्यांमध्ये मंदिराची काही चिन्हं आढळली, तर इथे मंदिर होतं हे स्पष्ट होईल. तसं काही न आढळल्यास ही कबरच (Tomb of Mumtaz) असल्याचं निश्चित होईल. एकूणच या खोल्या उघडल्यामुळे या वादावर कायमचा पडला पडेल. त्यामुळे या याचिकाकर्त्याची मागणी योग्य आहे,” असं मत राज किशोर यांनी व्यक्त केलं. शाहजहानने ताजमहाल खरंच बांधला का? राज किशोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताजमहाल बांधला जात असताना शाहजहान दक्षिण भारतात होता. मुमताजदेखील त्याच्यासोबतच होती. बुऱ्हाणपूरमध्ये मुमताजचा मृत्यू झाला. त्यानंतर शाहजहानचा मुलगा सूजा मुमताजचा मृतदेह घेऊन आग्र्याला पोहोचला. पहिल्यांदा मुमताजला ताजमहालची मुख्य इमारत आणि संग्रहालयाच्या मध्ये दफन करण्यात आले होते. त्यानंतर 6 महिन्यांनी तिला ताजमहालाच्या मुख्य कबरीत दफन केलं गेलं. तिथे ती कबर आत्ताही आहे. राज किशोर पुढे म्हणाले, “एवढी मोठी इमारत उभारली जात असताना शाहजहान त्या ठिकाणी का उपस्थित नव्हता? ताजमहाल ज्या ठिकाणी आहे ती जयपूरचे राजे मान सिंग यांची संपत्ती होती. शाहजहानने ताजमहाल उभारला नाही, तर आधीच तयार असलेल्या ताजमहालमध्ये बदल केलेला असू शकतो. त्याने मान सिंग यांचे नातू राजा जय सिंग यांना ताजमहालच्या बदल्यात चार इमारती दिल्या होत्या.” सोबतच, ताजमहालाच्या बांधणीसाठी 230 बैलगाड्या भरून संगमरवर खडक आणण्याचे आदेश दिलेलं पत्रही आपल्याकडे असल्याचा दावा राज किशोर यांनी केला आहे. 22 खोल्यांपर्यंत जाण्याचा रस्ता केलाय बंद ज्या 22 खोल्यांचा उल्लेख याचिकेमध्ये (Taj Mahal petition) करण्यात आला आहे, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आधी रस्ता उपलब्ध होता. मात्र, एएसआयने (ASI) 45 वर्षांपूर्वी हा रस्ता बंद केला. त्यामुळे त्या 22 खोल्यांमध्ये काय आहे हे अद्याप गुपितच (Secret rooms in Taj Mahal) आहे. या खोल्या उघडल्यास ताजमहालाची बरीच रहस्यं बाहेर येतील, असंही राज किशोर म्हणाले.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: Taj Mahal
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात