मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यातला 'अडथळा' फडणवीस करतील दूर?

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यातला 'अडथळा' फडणवीस करतील दूर?

'रामाच्या शरणात जो जात असेल त्याला जाऊ दिलं पाहिजे, रामाच्या शरणात जाण्यापासून कुणाला रोखण्याचे काही कारण नाही'

'रामाच्या शरणात जो जात असेल त्याला जाऊ दिलं पाहिजे, रामाच्या शरणात जाण्यापासून कुणाला रोखण्याचे काही कारण नाही'

'रामाच्या शरणात जो जात असेल त्याला जाऊ दिलं पाहिजे, रामाच्या शरणात जाण्यापासून कुणाला रोखण्याचे काही कारण नाही'

  • Published by:  sachin Salve

नाशिक, 10 मे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery Ayodhya visit ) जून महिन्यात अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहे. पण, उत्तरप्रदेशमधील भाजपचे खासदार ब्रीज भूषण सिंह (BJP MP Brij Bhushan Singh) यांनी विरोध केला आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या दौऱ्यावरून वाद निर्माण झाला आहे. 'रामाच्या शरणात जो जात असेल त्याला जाऊ दिलं पाहिजे, रामाच्या शरणात जाण्यापासून कुणाला रोखण्याचे काही कारण नाही, असं म्हणत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी ब्रीजभूषण सिंह यांची समजूत काढण्याचे संकेत दिले आहे.

आधी उत्तर भारतीयांची माफी मागा मगच अयोध्येला या, अशी आव्हान देत भाजपचे खासदार ब्रीजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना चॅलेंज दिले आहे. मनसेनं या मुद्यावर कुणालाही न बोलण्याची ताकीद दिली आहे. आता या प्रकरणाचा चेंडू देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात पडला असून त्यांनी आपले स्पष्ट मतही नोंदवले आहे.

(मेहुणीसोबतच राहत होता भावोजी! दुसऱ्या पत्नीच्या भावाने चाकू भोसकून केली हत्या)

'राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला ब्रीज भूषण यांच्या विरोधाच कारण मला माहित नाही. रामाच्या शरणात जो जात असेल त्याला जाऊ दिलं पाहिजे, रामाच्या शरणात जाण्यापासून कुणाला रोखण्याचे काही कारण नाही, असं म्हणत फडणवीस यांनी ब्रीजभूषण सिंह यांची समजूत काढण्याचे संकेत दिले आहे.

तसंच,' राज ठाकरेंनी राज्य सरकारकडून अपेक्षाच ठेवू नये. इतकी भाबडी अपेक्षा राज ठाकरे ठेवतील, असं वाटलं नव्हतं. जे सरकार लांगूलचालन करतंय, ज्या सरकारने इतक्या मर्यादा सोडल्यात. हनुमान चालिसा म्हणण्याची घोषणा केल्यानंतर जे राजद्रोहाचा गुन्हा लावून खासदार, आमदारांना 12 दिवस जेलमध्ये ठेवतात, त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा ठेवणं पूर्ण चुकीचं आहे. राज्य सरकारविरोधात आम्ही लढतोय, राज ठाकरेंनी पण लढलं पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले.

'शरद पवारांनी महाराष्ट्रातल्या प्रश्नांकडे लक्ष दिलं तर अधिक चांगलं. पवारांच्या बहुमूल्य सल्ल्याची आवश्यकता श्रीमान उद्धव ठाकरेंना आहे, त्यांना त्यांनी तो द्यावा, असा टोलाही फडणवीस यांनी पवारांना लगावला.

('मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावरुन लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांना धमक्या', रवी राणांचा गंभीर आरोप)

तसंच, 'मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. उत्तर प्रदेश सरकारने मुंबईत ऑफिस सुरू केलं तर लगेच घाबरून जाण्याची गरज नाही. मुंबई आणि महाराष्ट्र पावरफुल्ल आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या कार्यालयाचा काहीही परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही. महाराष्ट्रावर परिणाम मविआ सरकारमुळे होईल.  मंत्री जेल मधून काम करताय, वर्क फ्रॉम जेल सुरूय. अनाचार सुरू आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.

संभाजीराजेंनी आज माझी सदिच्छा भेट घेतली, आमची चांगली मैत्री आहे.  आमच्यात झालेली चर्चा सार्वजनिक करण्याची गरज वाटत नाही, असंही फडणवीस म्हणाले.

First published: