Home /News /national /

राज्यात 8 तास लाईट जाणार? राज यांच्या टीकेवर नेत्यांचा पलटवार, बंगालमधील कथित बलात्कार प्रकरण CBI कडे, TOP बातम्या एका क्लिक वर

राज्यात 8 तास लाईट जाणार? राज यांच्या टीकेवर नेत्यांचा पलटवार, बंगालमधील कथित बलात्कार प्रकरण CBI कडे, TOP बातम्या एका क्लिक वर

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

    मुंबई, 13 एप्रिल : मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी ठाणे येथील उत्तर सभेतून पुन्हा एकदा मशिदीवरून भोंग्यावरुन सरकारवर निशाणा साधला. आज गुणरत्न सदावर्ते (gunratna sadavarte) यांची पोलीस कोठडी संपणार आहे. तर किरीट सोमय्या (kirit somaiya) आणि त्यांच्या मुलाला सकाळी 11 वाजता या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. बंगालमधील हंसखळी कथित बलात्कार आणि हत्या प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आलंय. रशिया (Russia ukraine war) उद्दिष्ट पूर्ण करुनच थांबणार असल्याचा पुतिन यांचा इशारा. यासोबत देशासह जगभरातील महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर. धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य धक्का राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde ) यांना हृदयविकाराचा सौम्य धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital mumbai)  दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. धनंजय मुंडे यांनी प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.  ( Dhananjay Munde mild heart attack ) 3 मेपर्यंत मशिदीवरून भोंगे काढले नाहीतर.. राज ठाकरेंचा सरकारला थेट इशारा '3 तारखेला ईद आहे, माझी राज्य सरकारला, गृहखात्याला विनंती आहे. आम्हाला कोणतीही दंगल, तेढ निर्माण करायचा नाही. राज्याचे स्वास्थ बिघडवायचे नाही. आज 12 तारीख आहे, 12 ते 3 मेपर्यंत सगळ्या मौलवींशी बोलून घ्या, त्यांना समजावून सांगा, भोंगे काढून घ्या, 3 मेनंतर आमच्याकडून कोणताही त्रास होणार नाही, असा इशाराच राज ठाकरेंनी दिला.(raj thackeray thane sabha 2022) सदावर्तेंची कोठडी संपणार गुणरत्न सदावर्ते आणि अन्य आंदोलकांची कोठडी आज संपणार आहे. सातऱ्यातही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे. किरीट सोमय्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने महाराष्ट्र भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील यांना त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याप्रकरणी बुधवारी समन्स बजावले आहे. किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाला सकाळी 11 वाजता या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. KCR यांची मोठी घोषणा तेलंगणा सरकार किमान आधारभूत किंमतीवर संपूर्ण धानाचा साठा खरेदी करेल. खरेदी प्रक्रिया पाहण्यासाठी विशेष समितीची स्थापना. दिग्विजय सिंह यांच्यावर गुन्हा दाखल दिग्विजय सिंह यांच्यावर धार्मिक सलोखा बिघडवल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दिग्विजय सिंह यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 153(अ), २९५(अ), 465 आणि 505(2) अंतर्गत खटला. मुस्लिम समाजाचे हक्क आणि संपत्तीचे रक्षण करण्यात मध्य प्रदेश सरकार अपयशी ठरले आहे. खासदार मंत्री विश्वास सारंग यांनी ट्विटरकडे जातीय हिंसा भडकावल्याबद्दल दिग्विजय सिंह यांचे खाते निलंबित करण्याची मागणी केली. हंसखळी कथित बलात्कार आणि हत्या प्रकरण सीबीआयकडे कोलकाता हायकोर्टाने हंसखळी कथित बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सीबीआयकडे सोपवली. सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. सीबीआय आपला प्राथमिक तपास अहवाल 2 मे रोजी न्यायालयात सादर करणार आहे. कर्नाटकात कंत्राटदाराचा मृत्यू कर्नाटक पोलिसांनी कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्येची चौकशी सुरू केली असतानाच, विरोधक भाजप सरकारवर दबाव वाढवत आहेत. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर निदर्शने केली. पक्षाचे नेते बुधवारी राज्यपालांना भेटून ईश्वरप्पा यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी करणार आहेत. श्रीलंकेकडून दिवाळखोरीची घोषणा श्रीलंका हा देश स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटातून (Sri Lanka Economic Crisis) जात आहे. आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेनं मंगळवारी स्वतःला दिवाळखोर (Sri Lanka declares defaulting) घोषित केलं आहे. श्रीलंकेनं जाहीर केलं आहे की, ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं 51 अब्ज डॉलर्सचं विदेशी कर्ज फेडू शकत नाहीत. बातमी युद्धभूमीतून.. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले आहे की, युक्रेनमधील रशियाची लष्करी मोहीम आपली उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत सुरूच राहील. सोबतच पुतिन यांनी युक्रेनच्या बुचा येथील हत्या 'बनावट' असल्याचे सांगितले. एआयएमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांच्या द्वेषपूर्ण भाषण प्रकरणाचा निर्णय विशेष न्यायालयाने पुढे ढकलला. न्यायालय या प्रकरणाची सुनावणी करेल. इम्रान खान बुधवारी पेशावरमध्ये 'जलसा' (इव्हेंट) घेणार आहेत अमेरिकेत मेट्रो स्टेशनवर गोळीबार अमेरिकेतून एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात अंदाधुंद गोळीबाराची धक्कादायक बातमी समोर आली आहे. न्यूयॉर्कमध्ये सकाळी अनेक लोकांवर निर्दयीपणे अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. न्यूयॉर्कच्या Brooklyn या मेट्रो स्टेशनवर ही हल्ल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, या हल्ल्याची व्याप्ती मोठी आहे. या हल्ल्यात अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी अनेक स्फोट देखील घडवून आणल्याचं वृत्त समोर येत आलं होतं. पण त्या स्फोटांची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, न्यूयॉर्कच्या अग्निशमन दलाने गोळीबाराच्या घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अभिनेता दिलीपचा जामीन रद्द करण्याची मागणी केरळ पोलिसांच्या क्राइम ब्रँचने अभिनेता दिलीपचा जामीन रद्द करण्याची मागणी केली आहे, जो कोचीच्या अभिनेत्री अत्याचार प्रकरणातील आरोपी आहे: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेने या संदर्भात कोची येथील ट्रायल कोर्टात दिलीपवर आरोप केल्याचा आरोप करत याचिका दाखल केली. पुराव्याशी छेडछाड करणे आणि साक्षीदारांवर प्रभाव टाकणे. गेल्या वर्षी गुन्हे शाखेची अशीच याचिका न्यायालयाने फेटाळली होती. दिलीप हा या प्रकरणातील आठवा आरोपी असून त्याला 2017 मध्ये अटक करण्यात आली होती आणि तो दोन महिन्यांहून अधिक काळ कोठडीत होता. मध्य प्रदेश Amazon गांजा तस्करी प्रकरणाला नवे वळण ऑनलाईन मार्केटमध्ये दबादबा असलेल्या अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून गांजा तस्करीरी (Amazon Ganja Selling cas)  करणारं रॅकेट मध्य प्रदेशमध्ये उघड झालं होतं. आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. मध्यप्रदेश सरकारने अॅमेझॉन गांजा विक्री प्रकरण स्पेशल टास्क फोर्सकडे (STF) कडे सोपवलं आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Ajit pawar, Raj thacarey, Russia Ukraine

    पुढील बातम्या