जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / BREAKING : 3 मेपर्यंत मशिदीवरून भोंगे काढले नाहीतर.., राज ठाकरेंचा सरकारला थेट इशारा

BREAKING : 3 मेपर्यंत मशिदीवरून भोंगे काढले नाहीतर.., राज ठाकरेंचा सरकारला थेट इशारा

मुंबई, औरंगाबादपाठोपाठ आता 21 तारखेला पुण्यात सभेचं आयोजन करण्यात आले होते.

मुंबई, औरंगाबादपाठोपाठ आता 21 तारखेला पुण्यात सभेचं आयोजन करण्यात आले होते.

जे हिंदू माझं भाषण ऐकत असतील तर 3 मेपर्यंत जर यांनी भोंगे उतरवले नाही तर प्रत्येक मशिदीसमोर हनुमान चालीसा लावा

  • -MIN READ
  • Last Updated :

ठाणे, 12 एपिल :  ‘3 तारखेला ईद आहे, माझी राज्य सरकारला, गृहखात्याला विनंती आहे. आम्हाला कोणतीही दंगल, तेढ निर्माण करायचा नाही. राज्याचे स्वास्थ बिघडवायचे नाही. आज 12 तारीख आहे, 12 ते 3 मेपर्यंत सगळ्या मौलवींशी बोलून घ्या, त्यांना समजावून सांगा, भोंगे काढून घ्या, 3 मेनंतर आमच्याकडून कोणताही त्रास होणार नाही, असा इशाराच राज ठाकरेंनी दिला.(raj thackeray thane sabha 2022) ठाण्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची उत्तरसभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंनी यांनी पुन्हा एकदा मशिदीवरून आपली भूमिका स्पष्ट केली. ‘3 तारखेला ईद आहे, माझी राज्य सरकारला, गृहखात्याला विनंती आहे. आम्हाला कोणतीही दंगल, तेढ निर्माण करायचा नाही. राज्याचे स्वास्थ बिघडवायचे नाही. आज 12 तारीख आहे, 12 ते 3 मेपर्यंत सगळ्या मौलवींशी बोलून घ्या, त्यांना समजावून सांगा, भोंगे काढून घ्या, 3 मेनंतर आमच्याकडून कोणताही त्रास होणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले. 18 जुलै 2005 चा सुप्रीम हायकोर्टाचा निकाल आहे. कोणतेही मोठे वाद्य वाजवू नका. जर सुप्रीम कोर्टाने सांगितले असेल तर राज्य सरकारकडून अंमलबजावणी का होणार नाही. आम्ही हातावर हात ठेवून का बसायचे. जे हिंदू माझं भाषण ऐकत असतील तर 3 मेपर्यंत जर यांनी भोंगे उतरवले नाही तर प्रत्येक मशिदीसमोर हनुमान चालीसा लावा. त्यांनाही कळू द्या त्रास काय असतो. एकमेकांना त्रास देणे हा धर्म असू शकत नाही, असंही राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं. भोंगे काढण्यासाठी केसेस अंगावर आल्या तर घेऊ,  प्रार्थना करायची तर घरात करा,  सणवार असेल तर ठीक पण 365 दिवस भोंगे चालणार नाही आता फक्त हनुमान चालीसा सांगतोय,पुढचा बाण काढायला लावू नका, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला. अजित पवारांना व्हिडीओ लावून सुनावले ‘अजित पवार यांना पठ्ठा म्हणायची सवय आहे. तुमच्या माहितीसाठी मी 3 व्हिडीओ आणले आहे.  मी केव्हा काय बोललो हे मला नीट आठवतं. मी याच्याआधीही बोललो होतो. पण, त्याचे मला काही सापडले नाही. काय झालं, सकाळचा शपथविधी झाला, तो पवार साहेबांना कान काही ऐकू येत नाही. तसा त्यांना बॉम्ब फुटल्यानंतर कू असा आवाज येत होता. 28 जुलै 2018 रोजी मी बोललो होतो, असं म्हणत भोंग्याबद्दल व्हिडीओ चालून दाखवला. त्यानंतर 1 ऑगस्ट 2018 रोजी बोललो होतो, त्यावेळीही मी औरंगाबादमध्ये भोंग्याची स्पर्धा सुरू आहे, त्यांना अजान वाचायची असेल तर वाचा, लाऊडस्पिकर कशाला पाहिजे, असा व्हिडीओच लावून दाखवला. लॉकडाऊन लागण्याआधी सुद्धा अधिवेशनामध्ये सुद्धा मशिदीमध्ये भोंगे सुद्धा बंद केले पाहिजे, असं बोलणार व्हिडीओ राज ठाकरेंनी भर सभेत वाजवून दाखवले. ‘लॉकडाऊनमध्ये कान साफ झाला असेल, गुडीपाडव्याचा भोंगा ऐकू आला. मी चुकीचं काय बोललो. मशिदींवरच्या भोंग्यांचा अख्ख्या देशाला त्रास होतोय. यात धार्मिक विषय कुठे आला आहे. तुमची प्रार्थना, आम्हाला का ऐकवताय. भोंगे उतरवा हे नीट सांगून समजत नसेल तर मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार, हा धार्मिक नाही सामाजिक विषय आहे, असंही ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात