Home /News /videsh /

Russia-Ukraine War : युक्रेनमध्ये रशियाचा हल्ला तीव्र; शहराच्या शहरं उद्ध्वस्त

Russia-Ukraine War : युक्रेनमध्ये रशियाचा हल्ला तीव्र; शहराच्या शहरं उद्ध्वस्त

युक्रेनमधील मारियुपोल शहरातील नाट्यगृह पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. ड्रोन कॅमेऱ्यातील छायाचित्रांमध्ये मारियुपोलच्या विध्वंसाचे दृश्य दिसत होते. या हल्ल्यात सुमारे 300 लोकांचा मृत्यू झाला होता. रशियाने मारियुपोल येथे मोठा हल्ला केला.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 12 एप्रिल : रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले (Russia Ukraine War) करत आहे. रशियन हल्ल्यांमुळे युक्रेनची शहरे एकामागून एक उद्ध्वस्त होत आहेत. बोरोदियान्का (Borodyanka) येथील रशियन हल्ल्यांमुळे मोठा विध्वंस झाला. याशिवाय बुचा येथे झालेल्या हत्याकांडानंतर तेथे मदतकार्य सुरू आहे. रशियाने केए-52 हेलिकॉप्टरने युक्रेनवर हल्ला केला असून अनेक लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. खार्किवमध्ये मोठा विनाश या हल्ल्यात युक्रेनच्या लष्कराचे विमानविरोधी आणि काफिले उद्ध्वस्त झाले आहेत. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानेही हा व्हिडिओ जारी केला आहे. याशिवाय, युक्रेनमधील खार्किवमध्ये (Kharkiv) रशियाचे हल्ले तीव्र झाले असून रशियाकडून निवासी भागांवर बॉम्बफेकही सुरू आहे. रशियाच्या हल्ल्यांनंतर, खार्किवमध्ये मोठा विध्वंस झाला आहे आणि संपूर्ण शहर जवळजवळ रिकामे आहे. रशियाचे SU-25 हे लढाऊ विमान युक्रेनच्या डॉनबासच्या आकाशात दिसले, जे अत्यंत घातक मानले जाते. ही रशियन विमाने अतिशय कमी उंचीवर उडताना दिसली आहेत. याशिवाय युद्धनौकांच्या माध्यमातूनही शहरांवर जबरदस्त हल्ले केले जात आहेत. रशियाने काळ्या समुद्रात युक्रेनचे एक लढाऊ विमानही पाडले आहे. क्रिमियाच्या पश्चिम किनार्‍यावरून हा हल्ला करण्यात आला. हे वाचा - लग्न करण्यात शाहबाज शरीफ इम्रान यांच्या दोन पावलं पुढं! अफेयर्सची तर गिनतीच नाही मारियुपोल शहरात 300 ठार यापूर्वी युक्रेनमधील मारियुपोल शहरातील नाट्यगृह पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. ड्रोन कॅमेऱ्यातील छायाचित्रांमध्ये मारियुपोलच्या विध्वंसाचे दृश्य दिसत होते. या हल्ल्यात सुमारे 300 लोकांचा मृत्यू झाला होता. रशियाने मारियुपोल येथे मोठा हल्ला केला. येथे रशियन टँकच्या मदतीने हल्ले करण्यात आले. दुसरीकडे, युक्रेनची राजधानी कीवच्या बुचा या उपनगरातून नागरिकांच्या मृतदेहांची भयानक छायाचित्रे आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर भारतासह अनेक देशांनी याचा निषेध केला आहे आणि चौकशीची मागणी केली आहे. हे वाचा - रशियन सैन्याकडून बुचामध्ये 25 मुलींना कैदेत ठेवून बलात्कार, अनेकजणी प्रेग्नंट? युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी पुन्हा एकदा देशाला संबोधित केले आहे. झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, रशियाचे हल्ले आता हळूहळू कमी होत आहेत. कारण, त्याचे जगाशी असलेले संबंध संपुष्टात येत आहेत. रशियाचा हल्ला जगाला त्याच्याशी असलेले सर्व संबंध तोडण्यास भाग पाडत आहे. भारतासह जगातील अनेक देश हे युद्ध संपवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यात सोमवारी झालेल्या आभासी बैठकीत शांततेच्या प्रयत्नांवरही चर्चा झाली.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Russia Ukraine, War

    पुढील बातम्या