नवी दिल्ली, 12 एप्रिल : ऑनलाईन मार्केटमध्ये दबादबा असलेल्या अॅमेझॉनच्या माध्यमातून गांजा तस्करीरी (Amazon Ganja Selling cas) करणारं रॅकेट मध्य प्रदेशमध्ये उघड झालं होतं. आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. मध्यप्रदेश सरकारने अॅमेझॉन गांजा विक्री प्रकरण स्पेशल टास्क फोर्सकडे (STF) कडे सोपवलं आहे. 14 नोव्हेंबर 2021 रोजी Amazon च्या वेबसाईटवरुन विशाखापट्टनममधून मध्य प्रदेशात कडीपत्त्याच्या नावाखाली गांजाची तस्करी केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या माध्यमातून जवळपास एक टन गांजाची तस्करी केल्याची धक्कादायक बाब समोर आली. या प्रकरणाचा पोलीस गेल्या 6 महिन्यापासून तपास करत होते. आता हे प्रकरण स्पेशल टास्क फोर्सकडे (STF) कडे सोपवलं आहे. ( IPL 2022 : नवी मुंबईमध्ये दुबे-उथप्पाचं वादळ, RCB च्या बॉलिंगची धुलाई ) दरम्यान, मध्यंतरी देशात ASSL म्हणून काम करणाऱ्या Amazon India च्या कार्यकारी संचालकांविरुद्ध नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (NDPS) कायद्याच्या कलम 38 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर दुसरीकडे, या प्रकरणाचा पर्दाफाश करणारे एस. पी. मनोज कुमार सिंह (Bhind SP transferred) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यांना भोपाळ पोलीस मुख्यालयात (Bhopal PHQ) पाठवण्यात आलं. तर पोलीस मुख्यालयातले शैलेंद्र चौहान हे भिंडचे एसपी म्हणून मनोज कुमार सिंह यांची जागा घेतली. काय आहे नेमकं प्रकरण? Amazon च्या वेबसाईटवरुन विशाखापट्टनममधून मध्य प्रदेशात कडीपत्त्याच्या नावाखाली गांजाची तस्करी केली जात होती. या माध्यमातून आतापर्यंत जवळपास एक टन गांजाची तस्करी केल्याची धक्कादायक बाब समोर आली. पोलिसांनी या प्रकरणी सूरज उर्फ कल्लू आणि पिंटू उर्फ बिजेंद्रल सिंह तोमर या दोन आरोपींनी अटक केली आहे. 20 किलो गांजाची एक ऑर्डर विशाखापट्टनमवरुन अमेझॉनच्या माध्यमातून मागवली होती. गेल्या चार महिन्यांपासून अमेझॉनवरुन ही तस्करी सुरू होती. त्यामध्ये तब्बल एक टन गांजाची तस्करी करण्यात आली आहे. याची किंमत ही 1.10 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात आलं होतं. आरोपी सूरजने एका कपड्याच्या कंपनीच्या नावाखाली हर्बल उत्पादनं आणि कडी पत्ता उत्पादनाचा विक्रेत्याच्या नावाखाली रजिस्ट्रेशन केलं होतं. त्यानंतर त्याला अमेझॉनवर बारकोड मिळाला होता. ( अफजल खानची भूमिका साकारताना मुकेश ऋषी यांना आलं होतं ‘या’ गोष्टीचं टेन्शन ) भिंड पोलिसांनी (Bhind Police busted Ganja racket) काही दिवसांपूर्वी उघडकीस आणलं होतं. या प्रकरणात मध्य प्रदेश आणि विशाखापट्टणममधून काही व्यक्तींना अटकही करण्यात आली होती. मात्र या प्रकरणाने आता वेगळंच वळण घेतलं आहे. कारण आता या प्रकरणाचा पर्दाफाश करणारे एस. पी. मनोज कुमार सिंह (Bhind SP transferred) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांना भोपाळ पोलीस मुख्यालयात (Bhopal PHQ) पाठवण्यात आलं असून, पोलीस मुख्यालयातले शैलेंद्र चौहान हे भिंडचे एसपी म्हणून मनोज कुमार सिंह यांची जागा घेणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.