Home /News /national /

लाऊडस्पीकर संदर्भात गृहमंत्र्यांची बैठक, देशात कोरोना पुन्हा सक्रीय.. देशविदेशातील TOP बातम्या

लाऊडस्पीकर संदर्भात गृहमंत्र्यांची बैठक, देशात कोरोना पुन्हा सक्रीय.. देशविदेशातील TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

  मुंबई, 19 एप्रिल : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मशिदीतील लाऊडस्पीकर संदर्भात महत्वाची बैठक घेणार आहेत. तर राज ठाकरे यांचीही मनसे नेत्यांसोबत बैठक होणार आहे. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे भारताचे नवे लष्करप्रमुख झालेत. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना पुन्हा एकदा सक्रीय. युकेचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार आहे. यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. लाऊडस्पीकरवर उद्या गृहमंत्र्यांची बैठक राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे DGP राजनाथ सेठ यांची मशिदीत लाऊडस्पीकरवर बैठक घेणार आहेत. महाराष्ट्र सरकार लवकरच लाऊडस्पीकरच्या वापराबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहे, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले. मनसे नेत्यांसोबत बैठक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मनसे नेत्यांसोबत महत्वाची बैठक होणार आहे. यामध्ये लाऊडस्पीकरवर संदर्भात पुढीची भूमिका ठरवली जाऊ शकते.

  एकनाथ खडसेंचं महाजनांना जशास तसे उत्तर

  'गिरीश महाजन (girish mahajan) यांची स्मरणशक्ती कमी झाली. गिरीश महाजन यांनी त्यांच्या मुलाबाळांची शपथ घालून सांगावं निधीसाठी माझे पाय धरले की नाही? आपली लायकी आपणच ओळखायची असते दुसऱ्यांनी सांगायचे नसते' असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर जोरदार पलटवार केला. 'गणेश नाईकांची DNA चाचणी करा' भाजपचे नेते गणेश नाईक ( bjp leader Ganesh Naik) यांच्यावर एका महिलेनं लिव्ह इन रिलेशनशिपचा आरोप गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे नवी मुंबईत खळबळ उडाली आहे. आता ही पीडित महिला समोर आली असून आमची डीएनए चाचणी (dna test) करावी, कुठल्याही राजकीय पक्षाचा दबाव नाही, माझ्या मुलाला वडिलांचे नाव मिळावे, अशी मागणी पीडितेनं केली आहे.

  राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात हजारो कार्यकर्ते सहभागी होणार

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी अयोध्या (Ayodhya) दौऱ्याची घोषणा केली आहे. राज ठाकरे 5 जूनला अयोध्येला जाणार आहेत. त्यांच्या या अयोध्या दौऱ्यासाठी मनसे (MNS) कार्यकर्ते देखील उत्सूक आहेत. या अयोध्या दौऱ्यात कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्त्याना अयोध्येत जाण्यासाठी मनसेकडून ट्रेन बुक करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी 10 ते 12 ट्रेन बुक करण्यात येणार आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, नाशिक, नागपूर या ठिकाणाहून या ट्रेन बुक केल्या जाणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे सेनेकडून या ट्रेन बुक करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  सदावर्ते मुंबई, सातारा पाठोपाठ आता अकोल्याची जेलची हवा खाणार?

  एसटी कर्मचाऱ्यांची (ST Workers) कोर्टात भूमिका मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunratna Sadavarte) यांना सातारा कोर्टाने आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदावर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात साताऱ्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना साताऱ्यात सलग चार दिवस पोलीस कोठडीत राहावं लागलं. त्याआधी सदावर्ते यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील 'सिल्व्हर ओक' निवासस्थानी झालेल्या हल्ल्या प्रकरणात एसटी कर्मचाऱ्यांना चिथावल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. याप्रकरणी मुंबईतील किला कोर्टाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या सगळ्या घडामोडी घडत असताना राज्यातील इतर वेगवेगळ्या शहरांमध्येही सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे मुंबई आणि साताऱ्यातील जेलची हवा खालल्यानंतर सदावर्ते यांना आता अकोला पोलिसांकडून अटक केली जाणार आहे. विशेष म्हणजे अकोल्याचे प्रकरण हे एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याचं आहे. त्यामुळे हे प्रकरण सदावर्तेंच्या अडचणी वाढवू शकतं.

  रेल्वे स्थानकाजवळ RPF जवानांवर दहशतवाद्यांचा हल्ला

  जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) अतिरेक्यांचा (terrorist) हैदोस सुरुच आहे. काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात अतिरेक्यांनी सरपंचावर गोळीबार केल्याची बातमी ताजी असताना आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. पुलवामा (Pulwama) जिल्ह्यातील काकापोरा (Kakapora) रेल्वे स्थानकाबाहेर चहा पीत असलेल्या दोन रेल्वे पोलिसांवर अतिरेक्यांनी गोळीबार (Terrorists fired upon RPF personnel) केला. या गोळीबारात दोन्ही आरपीएफ जवान गंभीररित्या जखमी (injured) झाले. एसआय देव राज आणि एचसी सुरिंदर अशी आरपीएफ जवानांची नावे आहेत. या जवानांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. पण उपचारादरम्यान एका जवानाचा मृत्यू झाला. संबंधित घटनेनंतर परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. पोलीस अतिरेक्यांचा शोध घेत आहेत.

  लेफ्टनंट जनरल मनोज पांडे भारताचे नवे लष्करप्रमुख

  भारतीय लष्कराशी संबंधित एक सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय लष्कराचे विद्यमान लष्कर प्रमुख हे लवकरच सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे लष्करप्रमुखपदी नेमकी कोणाची नियुक्ती केली जाणार? याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर त्याबाबतचा निर्णय संरक्षण मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे भारतीय लष्कराचे प्रमुख असणार आहेत. यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर येणार आहेत. यात भारत विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्यासह आर्थिक गुन्हेगारांचे प्रलंबित प्रत्यार्पणाचा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे. विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा गेल्या वर्षी भारत आणि ब्रिटनमधील वर्च्युअल समिटमध्ये उपस्थित झाला होता, पंतप्रधान मोदी यांनी आर्थिक गुन्हेगारांना लवकरात लवकर खटल्यासाठी देशात परत पाठवले पाहिजे असे प्रतिपादन केले होते. जहांगीरपुरी हिंसाचार पोलिसांवर गोळीबार करणारा शूटर सोनू चिकना याला अटक. अन्सार आणि सलीम या दोन प्रमुख आरोपींच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ. कर्नाटक वाद: मठाच्या अनुदानात 30% कपात कंत्राटदार संतोष पाटील यांच्या मृत्यूनंतर आता लिंगायत धर्मगुरू यांनी कर्नाटक सरकार मठाच्या अनुदानात 30 टक्के कपात करत असल्याचा आरोप केला आहे. "स्वामीजींना अनुदान दिल्यास, 30% कमिशन कापल्यानंतरच ते दिले जाते", डिंगलेश्वर स्वामी यांचा आरोप. कोरोनानं पुन्हा वर डोकं काढलं दिल्लीत गेल्या 24 तासांत केलेल्या 6,492 चाचण्यांमधून 501 नवीन कोविड-19 प्रकरणांची नोंद झाली असून 290 बरे झाले आहेत तर मृत्यू शून्य आहेत. राष्ट्रीय राजधानीतील पॉझिटिव्हटी दर दोन आठवड्यांत 7.72% पर्यंत वाढला आहे. हरियाणा सरकारने राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील गुरुग्राम, फरीदाबाद, सोनीपत आणि झज्जर जिल्ह्यांमध्ये फेस मास्क घालणे अनिवार्य केले आहे.

  Russia-Ukrain War ठरू शकतं प्रत्येकी पाचव्या माणसाच्या गरिबीचं कारण

  युक्रेन-रशिया युद्धाचा आज 54 वा दिवस आहे. (Russia-Ukraine War) या 54 दिवसांत रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांवर बॉम्ब टाकले. या युद्धात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर लाखो लोक आपला देश सोडून शेजारच्या देशांमध्ये निर्वासित झाले आहेत. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर सुरू झालेल्या युद्धामुळे अनेक विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थांना धोका निर्माण झाला आहे. श्रीलंकेत सत्तापालट होणार का? श्रीलंका संसदेचे अधिवेशन सुरू होणार आहे. विरोधक अविश्वास प्रस्ताव आणण्याची शक्यता. श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी सोमवारी नवीन मंत्रिमंडळाची नियुक्ती केली. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मोठे निदर्शने सुरू असताना त्यांनी मंत्रिमंडळाची नियुक्ती केली आहे.
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: Pm modi, Raj thacarey

  पुढील बातम्या