जाहिरात
मराठी बातम्या / देश / लेफ्टनंट जनरल मनोज पांडे भारताचे नवे लष्करप्रमुख

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे भारताचे नवे लष्करप्रमुख

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे भारताचे नवे लष्करप्रमुख

भारतीय लष्कराशी संबंधित एक सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

प्रशांत लिला रामदास, प्रतिनिधी नवी दिल्ली, 18 एप्रिल : भारतीय लष्कराशी संबंधित एक सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय लष्कराचे विद्यमान लष्कर प्रमुख हे लवकरच सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे लष्करप्रमुखपदी नेमकी कोणाची नियुक्ती केली जाणार? याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर त्याबाबतचा निर्णय संरक्षण मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे भारतीय लष्कराचे प्रमुख असणार आहेत. भारताचे विद्यमान लष्करप्रमुख मनोज नरवणे येत्या 30 एप्रिल 2022 ला आपला 28 महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहेत. त्यानंतर लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची पुढील लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ( शरद पवारांच्या घरावर हल्ला प्रकरणी सदावर्तेंच्या पत्नीला तुर्तास अटक टळली, कोर्टाकडून दिलासा ) मनोज पांडे यांना डिसेंबर 1982 मध्ये कॉर्प्स ऑफ इंजिनीअर्समध्ये नियुक्त करण्यात आले होते. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ पल्लनवाला सेक्टरमध्ये ऑपरेशन पराक्रम दरम्यान इंजिनियर रेजिमेंटचे नेतृत्व केले आहे. आपल्या 39 वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत, लेफ्टनंट जनरल पांडे यांनी वेस्टर्न थिएटरमध्ये इंजिनियर ब्रिगेड, एलओसीवर पायदळ ब्रिगेड, लडाख सेक्टरमधील माउंटन डिव्हिजन आणि ईशान्येकडील कॉर्प्सचे नेतृत्व केले आहे. ईस्टर्न कमांडचा पदभार स्वीकारण्यापूर्वी ते अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात