नवी मुंबई, 18 एप्रिल : भाजपचे नेते गणेश नाईक ( bjp leader Ganesh Naik) यांच्यावर एका महिलेनं लिव्ह इन रिलेशनशिपचा आरोप गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे नवी मुंबईत खळबळ उडाली आहे. आता ही पीडित महिला समोर आली असून आमची डीएनए चाचणी (dna test) करावी, कुठल्याही राजकीय पक्षाचा दबाव नाही, माझ्या मुलाला वडिलांचे नाव मिळावे, अशी मागणी पीडितेनं केली आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे आमदार गणेश नाईक चांगलेच अडचणीत सापडले आहे. ज्या पीडितेनं नाईकांवर आरोप केला. त्या महिलेनं आता समोर येऊन आपली भूमिका मांडली. ’ माझ्यावर अत्याचार झालाय, माझं शोषण झालंय, मला टॉर्चर केलं गेलंय अशी उद्विग्न प्रतिक्रिया गणेश नाईक यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या तक्रारदार महिलेने व्यक्त केली आहे. डीएनए टेस्ट केल्याशिवाय याचा निर्णय लागू शकत नाही. त्यामुळे आमची डीएनए टेस्ट करावी. जिथे जिथे मला मदत भेटेल तिथे तिथे मी जाणार असून मला कुठल्याही राजकीय पक्षाचा दबाव नसल्याचेही पीडित महिलेनं स्पष्ट केलं. ( The Kashmir Files आता घरबसल्या पाहाता येणार, कुठे होणार या सिनेमाचे स्ट्रीमिंग? ) ‘आमच्यावर सुरुवातीपासून भेदभाव होत आलाय, कुठेही आमचा स्वीकार केला गेला नाही, आम्हाला लपवून ठेवलं गेलं. नाईकांची माझ्या मुला विषयी कोणतीही प्रेमाची भावना देखील नाही. अशी प्रतिक्रिया देखील दीपा चौहान यांनी व्यक्त केलय. यासोबतच मला पैश्याचा मोह नसून फक्त मुलाला वडिलांचे नाव मिळावं हीच अपेक्षा असल्याचे या महिलेनं स्पष्ट केलंय. ( औरंगाबादमध्ये RTO कार्यालयात अग्नितांडव, अनेक वाहनं जळून खाक, घटनास्थळाचा VIDEO ) ‘आमच्यावर सुरुवातीपासून भेदभाव होत आलाय, कुठेही आमचा स्वीकार केला गेला नाही, आम्हाला लपवून ठेवलं गेलं. नाईकांची माझ्या मुला विषयी कोणतीही प्रेमाची भावना देखील नाही’ अशी व्यथाही या महिलेनं मांडली. मला पैश्याचा मोह नसून फक्त मुलाला वडिलांचे नाव मिळावं हीच अपेक्षा, आहे, असंही पीडित महिलेनं सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.