Home /News /national /

राज्यात पाच दिवसांचा कोळसा शिल्लक, राष्ट्रवादी-भाजपमध्ये ठग वॉर, बलात्कार प्रकरणी केंद्राच पथक बंगालमध्ये, देशविदेशातील TOP बातम्या

राज्यात पाच दिवसांचा कोळसा शिल्लक, राष्ट्रवादी-भाजपमध्ये ठग वॉर, बलात्कार प्रकरणी केंद्राच पथक बंगालमध्ये, देशविदेशातील TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

  मुंबई, 15 एप्रिल : राज्यातील जनतेला लोडशेडिंगला (load-shedding) सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्या टीकेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. रामनवमी हिंसाचारावरुन एमपीच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. बंगाल येथील बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्राच पथक जाणार आहे. रशियाकडून युक्रेनचं हवाई तळ उद्धवस्त यासह देशविदेशातील बातम्या वाचा. राज्याकडे अवघ्या पाच दिवसांचा कोळसासाठा शिल्लक राज्यावरील वीजसंकट (Maharashtra Power Crisis) दिवसेंदिवस आणखी गडद होताना दिसत आहे. राज्याकडे कोळासाचा साठा (Coal storage) फार कमी आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला लोडशेडिंगला (load-shedding) सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. राज्यावरील संभाव्य वीजसंकटाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. सत्ताधारी सरकार या प्रश्नाचं निरसन करतं का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण दुसरीकडे राज्यात वीजनिर्मिती करणारी महाजेनको (Mahagenco) कंपनीने आगामी संकट लक्षात घेता काही उपाययोजन केल्या आहेत का? हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्ही महाजेनकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे (Sanjay Khandare) यांच्याशी बातचित केली. त्यांच्याशी बातचित केल्यानंतर राज्यावरील वीजसंकट खरंच खूप गडद असल्याचं जाणवलं. पण कोळसा उपलब्ध झाल्यास राज्यावरील भारनियमन किंवा लोडशेडिंगचं संकट दूर होऊ शकतं, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. राज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही : पवार गुढीपाडव्याच्या मुंबईतील सभेनंतर झालेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी मनसेने ठाण्यात उत्तरसभा (MNS Uttar Sabha in Thane) आयोजित केली. ठाण्यातील उत्तरसभेत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आपल्या भाषणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनीही राज ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, की मनसे अध्यक्ष राज ठाकरे चार-सहा महिन्यांत अचानक उगवतात. त्यांच्या सभांना गर्दी होते, मात्र त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. मात्र विशेष बाब म्हणजे स्वतः शरद पवारच आपल्या 30 मिनिटांच्या पत्रकार परिषदेत २२ मिनिटं राज ठाकरेंविषयीच बोलत राहिले. राज ठाकरे यांचा प्रत्येक मुद्दा खोडून काढताना पवार यांनी राज यांच्या प्रश्नांचे खुलासे दिले. मृत व्यक्तीला कागदोपत्री जीवंत दाखवलं साताऱ्यातून भाजप आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्याबाबत एक धक्क्दायक बातमी समोर आली आहे. आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात फसवणूक, अनुसूचित जाती जमाती कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साताऱ्याच्या दहिवडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जयकुमार गोरे यांच्यासह त्यांच्या पाच सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरु आहे. पोलीस या प्रकरणी गोरेंना अटक करतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पवार यांच्यावर जातिवादाचा आरोप शिवाजी महाराज यांच्यावरून शरद पवार यांच्यावर जातिवादाचा आरोप होत आहे. आधी राज ठाकरे मग आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पवार यांच्यावर हल्लाबोल.  अखेर कर्नाटक सरकारमधील मंत्री केएस ईश्वरप्पा राजीनामा देणार कर्नाटक सरकारमधील मंत्री केएस ईश्वरप्पा (ks eshwarappa) उद्या म्हणजेच शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. कंत्राटदार संतोष पाटील (Santosh Patil Suicide Case) यांच्या कथित आत्महत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेले मंत्री ईश्वरप्पा यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सादर करणार असल्याचे सांगितले. तत्पूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) म्हणाले की, वादग्रस्त मंत्री ईश्वरप्पा सध्यातरी सरकारमध्येच राहतील. पंतप्रधान मोदी हॉस्पिटल राष्ट्राला समर्पित करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुजरातमधील भुज येथील केके पटेल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल राष्ट्राला समर्पित करतील.

  सैन्याच्या गाडीचा भीषण अपघात

  काश्मीरच्या शोपियान (Shopian) जिल्ह्यात एक वाईट दुर्घटना घडली आहे. अतिरेक्यांसोबत सुरु असलेल्या चकमकीच्या ठिकाणी भारतीय लष्कराचं एक वाहन रस्त्याने जात होतं. पण ओल्या रस्त्यामुळे त्या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात तीन जवानांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर पाच जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी श्रीनगर मिलिटरी बेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघाताची घटना ही कनिपोरा गावाजवळ घडली. हंसखळी बलात्कार प्रकरण भाजपचे 5 सदस्यीय केंद्रीय पथक हंसखळी येथे जाणार आहे. भाजपच्या उपाध्यक्षा आणि खासदार रेखा वर्मा, उत्तर प्रदेश सरकारच्या मंत्री बेबी राणी मौर्य, तामिळनाडूच्या आमदार वनाथी श्रीनिवासन, ज्या भाजप महिला शाखेच्या प्रमुख आहेत, कुशबू सुंदर आणि पश्चिम बंगालच्या आमदार श्रीरूपा मित्रा चौधरी यांचा या शोध पथकात समावेश आहे. ते हंसखळीला भेट देतील आणि पीडित कुटुंब आणि इतरांशी चर्चा करतील. दिल्लीत कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं गुरुवारी दिल्लीत कोरोनाची प्रकरणे वाढू लागली आहेत, शहरात 24 तासांच्या कालावधीत 325 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आता नोएडा नंतर दिल्ली सरकार त्यांच्या शाळांना आवश्यक उपाययोजना करण्यास सांगणारा अॅडव्हाजरी जारी केला आहे. रामनवमी हिंसाचारात सहभागी असलेल्यांना सोडणार नाही : मुख्यमंत्री शिवराज सिंह सीसीटीव्ही व्हिडिओ समोर येत असताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवारी इशारा दिला की त्यांचे सरकार दंगलीत सहभागी असलेल्या कोणालाही सोडणार नाही. नुकत्याच झालेल्या हिंसाचारात सहभागी असलेल्या 'बेकायदेशीर वास्तू' पाडण्याचे समर्थनही केलं. रामनवमीच्या उत्सवादरम्यान जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनांनंतर रविवारी संध्याकाळी खरगोनमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला होता. हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 121 जणांना अटक केली आहे. मध्य प्रदेशातील मशिदींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील, रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक झाल्यानंतर खरगोन शहरात हिंसाचार आणि जातीय तणाव निर्माण झाला, असे एका मुस्लिम धार्मिक नेत्याने गुरुवारी येथे सांगितले.  एमके स्टॅलिन यांचा राज्यपालांच्या कार्यक्रमावर बहिष्कार एमके स्टॅलिन यांनी राज्यपालांना पत्र लिहून नीट विरोधी विधेयक सरकारकडे पाठवण्याची विनंती केली. डीएमके यांनी आज राज्यपालांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. कारण त्यांनी त्यांना NEET बाबत कोणतेही आश्वासन दिले नाही. शांघाय अधिकाऱ्यांनी शहरातील लॉकडाऊन नियम शिथिल करण्याचा आपला निर्णय मागे घेतला. कारण दररोज कोविड -19 चे संक्रमण वाढत आहे. बातमी युद्धभूमीतून आज, युक्रेनियन युद्धाच्या 51 व्या दिवशी, रशियाने जपानच्या समुद्रात पाणबुडीवरून क्रूझ क्षेपणास्त्र चाचणी घेतली, KA-52 हेलिकॉप्टर टीमने युक्रेनियन हवाई दलाच्या तळावर हल्ला केला आणि लष्करी उपकरणे नष्ट केली. तर स्वीडन, फिनलंड नाटोमध्ये सामील झाल्यास रशियाने बाल्टिकमध्ये अण्वस्त्रे तैनात करण्याची धमकी दिली आहे. यूकेने संभाव्य स्वीडन आणि फिनलंड यांना नाटोमध्ये सहभागी होण्यास समर्थन दिलं आहे.
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: BJP, NCP, Pm modi, Shard pawar

  पुढील बातम्या